आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत अधिक सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.


मुंबई महानगर क्षेत्रातील खासगी रुग्णालयांचा या योजनेत सहभाग वाढवण्यासाठी मंत्रालयात मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शांताराम मोरे, सुलभा गायकवाड, चंद्रकांत पाटील, अभिजित पाटील, मनीषा चौधरी, दिलीप लांडे, संजय उपाध्याय तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


यावेळी बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले की, गरीब व गरजू नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा राज्य शासनाचा प्रमुख उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळावा यासाठी मोठ्या व नामांकित खासगी रुग्णालयांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे.


मुंबईसारख्या महानगरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांनाही मिळावा, यासाठी खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाकडून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.


मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, राज्य शासनाने या योजनेतील उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढवली आहे. तसेच उपचारांच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. रुग्णालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने निश्चित कालमर्यादेत पार पडत आहे. गुणवत्ता निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयांना अतिरिक्त प्रोत्साहन रक्कमही दिली जात आहे.





गेल्या वर्षभरात घेतलेल्या विविध सुधारात्मक निर्णयांमुळे रुग्णसंख्या, उपचारांची संख्या आणि त्यावरील खर्चातही लक्षणीय वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.


तसेच योजनेचे जिल्हा समन्वयकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करावे, तसेच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जनआरोग्य समित्यांच्या नियमित बैठका घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.


दरम्यान, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली असून खासगी रुग्णालयांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योजनेत सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.


बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी योजनेत करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. तर राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी उपचारांतील वाढ, दरातील बदल, ऑनलाईन प्रणाली आणि दाव्यांच्या वेळेवर अदायगी याबाबत सादरीकरण केले.


यावेळी उपस्थित आमदार तसेच मुंबई महानगर परिसरातील खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींनीही आपली मते मांडली.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि