Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील कोंडापल्ली औद्योगिक विकास क्षेत्रात एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत सायकोट्रॉपिक पदार्थ अल्प्राझोलमचे उत्पादन करणाऱ्या एका छुप्या सुविधेचा पर्दाफाश केला आहे.


गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवर आधारित आणि सुव्यवस्थित असे 'ऑपरेशन व्हाईट हॅमर' हे अभियान ११ आणि १२ मार्च २०२६ रोजी राबवण्यात आले, ज्यातून रासायनिक उत्पादन युनिटच्या नावाखाली कार्यरत असलेला अल्प्राझोलमच्या उत्पादनाचा एक पूर्ण विकसित औद्योगिक सेटअप उघडकीस आला.


परिसरात झडती घेण्यात आली असता २३७ किलो अल्प्राझोलम जप्त करण्यात आले ज्याचे बाजारमूल्य अंदाजे ४७ कोटी रुपये आहे, तसेच ८०० किलोहून अधिक प्रमुख कच्चा माल, २८६० लिटर विविध रसायने आणि रिअॅक्टर, ड्रायर आणि सेंट्रीफ्यूज सारखी औद्योगिक उपकरणे जप्त करण्यात आली, ज्यातून ही एक संघटित, मोठ्या प्रमाणात गुप्त उत्पादन सुविधा असल्याचे दिसून येते.


प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की रसायन आणि औषधनिर्माण क्षेत्रात २० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या एका औषधविक्रेत्याने हैदराबादमध्ये कच्चा माल आणि वितरण व्यवस्था करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्याशी संगनमत केले होते. आरोपीने अल्प्राझोलमचे छुप्या पद्धतीने उत्पादन करण्यासाठी कारखान्याचा परिसर भाड्याने घेतला होता. दोन्ही सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे.


चालू आर्थिक वर्षात, डीआरआयने गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे आठ गुप्त औषध उत्पादन युनिट्स उद्ध्वस्त केले आहेत, ज्यामुळे सरकारच्या नशा मुक्त भारत अभियान आणि समाजाचे आणि लोकांचे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या धोक्यापासून संरक्षण करण्याप्रति त्यांची दृढ वचनबद्धता पुन्हा स्पष्ट झाली आहे.

Comments
Add Comment

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून