धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेच्या सुमारास गावातील मुख्य रस्त्यावर एक अस्वल फिरताना दिसले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.


गावातील रस्त्यांवर आणि वस्ती जवळ अस्वल दिसल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी घराबाहेर पडताना ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनी लहान मुलांना एकटे बाहेर न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.धामणगाव गढी परिसर जंगलालगत असल्याने वन्य प्राणी अधूनमधून गावाच्या हद्दीत येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र यावेळी अस्वल थेट गावातील रस्त्यावर फिरताना दिसल्यामुळे नागरिकांनी तातडीने वनविभागाने लक्ष देण्याची मागणी केली आहे.


स्थानिक नागरिकांनी वनविभागाने त्वरित पथक पाठवून अस्वलाला सुरक्षितपणे पकडून पुन्हा जंगलात सोडावे, तसेच गाव परिसरात नियमित गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे.


दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेनंतर ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली असून वनविभागाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने