ट्रान्सजेंडर गँगने अपहरण करुन सुरतला नेले आणि शस्त्रक्रियेद्वारे केला लिंगबदल, तरुणाचा आरोप


मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरातून ट्रान्सजेंडर गँगने अपहरण केले आणि जबरदस्तीने सुरतला नेले, तिथे शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला. यानंतर मुद्दाम भिक्षा मागण्याची सक्ती केली आणि भिक्षेतून मिळालेले पैसे लुबाडून बेदम मारहाण केली. या प्रकाराने हादरलेला तरुण संधी मिळताच पळाला आणि मुंबईत परतला. मुंबईत येताच तरुणाने मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यात ट्रान्सजेंडर गँग विरोधात अपहरण करणे, जबरदस्ती करणे, बेदम मारहाण करणे, विना संमती जबरदस्तीने लिंगबदल शस्त्रक्रिया करणे, पैसे लुबाडणे अशा विविध आरोपांतर्गत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार येताच ट्रान्सजेंडर गँग विरोधात गुन्हा नोंदवला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि चार जणांना अटक केली. आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे.


ट्रान्सजेंडर गँगने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी अपहरण केले आणि जबरदस्तीने सुरतला नेले, तिथे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला; असा आरोप पीडित तरुणाने केला आहे. पीडित तरुण १९ वर्षांचा आहे. यामुळे तक्रार येताच पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि तातडीने तपास सुरू केल. आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून उर्वरित तीन जणांचा शोध सुरू आहे.


मुंबईत सक्रीय असलेल्या ट्रान्सजेंडर गँगने याआधी काही गुन्हे केले आहेत याचाही तपास सुरू आहे. पोलीस सर्व बाजू तपासून बघत आहेत.


Comments
Add Comment

प्रिमियम घरांच्या किंमतीत १ वर्षात ३६% वाढ

सॅविल्स इंडिया अहवालात स्पष्ट मुंबई: प्रामुख्याने भारतातील महत्वाच्या प्रमुख शहरात इयर ऑन इयर बेसिसवर

शरद पवारांची अजित पवारांसोबत आघाडी फिस्कटली, मविआसोबत जाण्याची तयारी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय

Bangladesh James Show : बांगलादेश हादरलं! 'भीगी भीगी' फेम गायक जेम्सच्या कॉन्सर्टवर दगडफेक; १५-२० विद्यार्थी जखमी, कार्यक्रम रद्

ढाका : बांगलादेशातील प्रसिद्ध रॉक स्टार आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक जेम्स (फारूक महफूज अनम) याच्या संगीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमुळे इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात '६ पट', निर्यातीत '८ पट' वाढ-अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक करत इलेक्ट्रॉनिक उत्पादनात ६ पटीने, तर

Japan : जपानमध्ये ५० वाहनांचा थरारक साखळी अपघात! एक्स्प्रेस वेवर वाहनांचे जळते लोळ; एका महिलेचा मृत्यू, २६ प्रवासी जखमी

टोकियो : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच जपानमध्ये एका भीषण अपघाताने शोककळा पसरली आहे. जपानमधील एका

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई