कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन्स स्टेडियम येथे खेळवला जात आहे. हा सामना तीन दिवसांत संपण्याची शक्यता आहे.

कोलकाता येथे सुरू असलेला कसोटी सामना शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी सुरू झाला. अवघ्या दोन दिवसांत २६ फलंदाज बाद झाले. यामुळे सामना रविवार १६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच तिसऱ्या दिवशी संपण्याची शक्यता आहे.



नाणेफेक जिंकून कोलकाता कसोटीत फलंदाजीचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने घेतला. त्यांचा पहिला डाव १५९ धावांत आटोपला. यानंतर मैदानावर आलेल्या भारताने नऊ बाद १८९ धावा केल्या. शुभमन गिल फलंदाजी करत असताना मानेचे स्नायू दुखावल्यामुळे निवृत्त झाला. भारताचा पहिला डाव १८९ धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची पुन्हा एकदा दाणादाण उडाली. फक्त ९३ धावांत दक्षिण आफ्रिकेचे सात फलंदाज बाद झाले. दक्षिण आफ्रिकेने ६३ धावांची आघाडी घेतली असली तरी कर्णधार बावुमा वगळता त्यांच्याकडे उर्वरित तळाचे फलंदाज आहे. सध्याची स्थिती बघता कोलकाता कसोटी लवकर संपण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

भारताचे सलग चौथ्या टी-२० विजयाकडे लक्ष

आज तिरुवनंतपुरमला श्रीलंकेविरुद्ध सामना तिरुवनंतपुरम : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेवर आधीच कब्जा मिळवलेल्या

क्रिकेटच्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, मुंबईकर आयुष म्हात्रेकडे नेतृत्व

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात कोण कितव्या स्थानी ?

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका

ऑस्ट्रेलियात इंग्लंडचा विजय, मेलबर्न कसोटी दोन दिवसांत संपली

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे