नाणेफेक जिंकून कोलकाता कसोटीत फलंदाजीचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने घेतला. त्यांचा पहिला डाव १५९ धावांत आटोपला. यानंतर मैदानावर आलेल्या भारताने नऊ बाद १८९ धावा केल्या. शुभमन गिल फलंदाजी करत असताना मानेचे स्नायू दुखावल्यामुळे निवृत्त झाला. भारताचा पहिला डाव १८९ धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची पुन्हा एकदा दाणादाण उडाली. फक्त ९३ धावांत दक्षिण आफ्रिकेचे सात फलंदाज बाद झाले. दक्षिण आफ्रिकेने ६३ धावांची आघाडी घेतली असली तरी कर्णधार बावुमा वगळता त्यांच्याकडे उर्वरित तळाचे फलंदाज आहे. सध्याची स्थिती बघता कोलकाता कसोटी लवकर संपण्याची शक्यता आहे.That will be Stumps on Day 2⃣! 🙌 4⃣ wickets for Ravindra Jadeja 2⃣ wickets for Kuldeep Yadav 1⃣ wicket for Axar Patel An impressive show from #TeamIndia bowlers in the 2️⃣nd innings 👏 Scorecard ▶️ https://t.co/okTBo3qxVH #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/kHVZ8PP99R
— BCCI (@BCCI) November 15, 2025






