Ola Electric Share Crash:ओला इलेक्ट्रिकवर गंभीर आरोपानंतर शेअर ३% पेक्षा अधिक पातळीवर कोसळला ओला इलेक्ट्रिककडूनही 'हे' आक्रमक प्रतिउत्तर

मोहित सोमण: ओला इलेक्ट्रिक लिमिटेड (Ola Electric Limited) शेअर आज मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. प्रामुख्याने एका कोरियन प्रकाशनाकडून ओला इलेक्ट्रिकलवर गंभीर आरोप करण्यात आले होते. याला कडाडून प्रतिउत्तर ओला इलेक्ट्रिकने दिले असले तरी शेअरला गुंतवणूकदारांनी आज नकारात्मक प्रतिसाद दिला असून बाजारात शेअर्समध्ये मोठे सेल ऑफ झाल्याची शक्यता आहे. सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलात शेअर ३% अधिक पातळीवर कोसळला होता. सकाळी ११.११ वाजेपर्यंत शेअर २.५४% कोसळत ४५.६० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.


कोरियन पब्लिकेशने सुत्रांचा अहवाल देत ओलावर गंभीर आरोप केले आहेत. दक्षिण कोरियातील अहवालांमध्ये असा आरोप ओलावर करण्यात आला आहे की एलजी एनर्जी सोल्यूशनच्या एका माजी कार्यकारी अधिकाऱ्याने ओला इलेक्ट्रिकला पाउच सेल तंत्रज्ञानाचे आयपी देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कंपनीवर 'चोरीचा' शिक्का प्रकाशनाने बसवलेल्यानंतर ओला इलेक्ट्रिकने त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हे आरोप तद्दन खोटे असून निराधार आहेत असा दावा ओला इलेक्ट्रिकने केला आहे. दरम्यान भारताच्या नवोन्मेषासाठी ओलाने विकसित केलेल्या ४६८० भारत सेल (4080 Bharat Cell) यांच्या उत्पादनाला बदनाम करण्याचे कारस्थान काही परकीय शक्तींनी केल्याचा दावा ओलाने केला आहे.


ओलाने दिलेल्या वृत्तानुसार, एलजी एनर्जी सोल्यूशनच्या माजी कार्यकारीने कंपनीसोबत पाउच सेल तंत्रज्ञान शेअर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. ओला इलेक्ट्रिकने स्पष्ट केले की त्यांचा या कार्यकारीाशी कोणताही संबंध नाही आणि पाउच सेल तंत्रज्ञान जुने आहे आणि ते फर्मसाठी संशोधन किंवा व्यावसायिक हिताचे क्षेत्र देखील नाही' असे कंपनीने पुढे अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे.


असे असताना, त्याऐवजी ओलाने म्हटले की त्यांचा ४६८० भारत सेल दंडगोलाकार स्वरूपात अधिक प्रगत ड्राय इलेक्ट्रोड तंत्रज्ञानावर आधारित आहे जो पूर्णपणे इन-हाऊस विकसित केला गेला आहे असेही म्हटले आहे. कंपनीने अलीकडेच ४६८० भारत सेलचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे ज्याचे वर्णन त्यांनी आंतरराष्ट्रीय बॅटरी उत्पादकांना टक्कर देण्यासाठी डिझाइन केलेले भारतातील पहिले स्वदेशी लार्ज-फॉरमॅट सेल आहे'.


'मीडिया लीकची वेळ आमच्या ४६८० भारत सेलच्या व्यावसायिक उत्पादनात प्रवेश करण्याच्या वेळेशी जुळते' असेही गंभीर दखल कंपनीने घेत परदेशी मिडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे‌ .ओलाने त्यावर आक्रमक प्रतिक्रिया घेत असा आरोप केला आहे की ओलाला व्यवसाय संधी गमावण्याची भीती परदेशी प्रतिस्पर्ध्याने 'सुव्यवस्थित हल्ला' केला हा असावा.' असे म्हटले.तसेच कंपनी ओला इलेक्ट्रिकने सेल संशोधन आणि विकासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. बेंगळुरूमधील त्यांच्या बॅटरी इनोव्हेशन सेंटरमध्ये २५० हून अधिक तज्ञ कार्यरत आहेत आणि कंपनीकडे १२४ मंजूर पेटंटसह ७२० पेटंट फाइलिंग आहेत.


कंपनीने देशांतर्गत ऊर्जा उत्पादन क्षमता मजबूत करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून २५०० कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकीतून बांधलेल्या भारतातील पहिल्या कार्यरत गिगाफॅक्टरीच्या स्थापनाही यावेळी अधोरेखित केली होती.याविषयी बोलताना,'ओला इलेक्ट्रिक बौद्धिक संपत्तीला आणि खऱ्या नवोपक्रमाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना महत्त्व देते' असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी ६ तारखेला ओला इलेक्ट्रिक शेअर ५% कोसळत लोअर सर्किटवर पोहोचला होता. या तिमाहीत कंपनीच्या तोट्यात घसरण झाली असली तरी इयर टू डेट (Year to Date YTD) बेसवर शेअर आतापर्यंत ४५% कोसळला आहे.

Comments
Add Comment

Sugar Share Surge: 'या' कारणामुळे साखर कारखान्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ

मोहित सोमण: केंद्र सरकारने दिलेल्या पाठिंब्यामुळे आज साखरेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. केंद्र

Pune Crime : आय लव्ह यू... आणि मर्डर! बायकोच्या फोनवरून मित्राला 'तो' मेसेज; 'दृश्यम' स्टाईल हत्येनंतर समीरने कसा रचला डिजिटल पुरावा?

पुणे : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा गाजलेला चित्रपट 'दृश्यम' (Drishyam) पाहून पुण्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची

Lenskart Share Listing: लेन्सकार्ट शेअरचे निराशाजनक लिस्टिंग ! 'होत्याचे नव्हते' झाले हाती आले धोपटणे?

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात लेन्सकार्ट लिमिटेड (Lenskart IPO Limited) हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी निराशेची ठरली आहे. कंपनीचा

Stock Market: तीन दिवसांच्या घसरणीनंतर परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू, सेन्सेक्स निफ्टी वधारला खरा पण ही अस्थिरता महिनाभर राहणार?

मोहित सोमण:आशियाई शेअर बाजारातील सुरूवातीच्या तेजीमुळे आणि प्रामुख्याने घसरत चाललेली परदेशी गुंतवणूकदारांची

Top Stocks Recommendations Today: चांगल्या रिटर्न्ससाठी मोतीलाल ओसवालकडून 'हे' २० शेअर खरेदी करण्याचा सल्ला वाचा लिस्ट 'थोडक्यात'

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवालकडून शेअर खरेदीसाठी संबंधित शेअर्सला बाय कॉल देण्यात आलेला यादी पुढीलप्रमाणे - १)

Stock Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीने सुरूवात मात्र 'या' कारणांमुळे अस्थिरता कायम सेन्सेक्स २५०.९९ व निफ्टी ७८.९० अंकांने वधारला

मोहित सोमण:आज जागतिक बाजारपेठेतील दबाव शेअर बाजारात असल्याचे गिफ्ट निफ्टीतील सुरूवातीच्या कलात स्पष्ट झाले