धक्कादायक! पत्नीचे नाक कापले आणि प्राण्यांनी ते खाल्ले, मध्यप्रदेशमधील घटना

मध्यप्रदेश: पतीने आपल्या पत्नीचे नाक कापले आणि नंतर हे नाक जनावराने खाल्ले अशी धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातून समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. तर जखमी पत्नीवर झाबुआ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राणापूर पोलिस स्टेशन परिसरातील पडलवा गावातील रहिवासी राकेश हा संतरामपूर येथे एका कारखान्यात काम करत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नीसुद्धा कारखान्यात काम करत होती. या कारखान्यात बिहारचा एक कामगारही काम करत होता. जखमी महिला त्या कामगारासोबत बोलत असल्याने पतीने तिच्यावर संशय घेतला. यानंतर त्यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली.

राकेश आणि त्याची पत्नी संतरामपूरहून त्यांच्या गावी पडळवा येथे दुचाकीवरून परतत होते. यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला. राग अनावर झाल्याने पतीने आपल्या पर्समधून ब्लेड काढून पत्नीचे नाक कापले. तसेच तिच्या बोटांवरही ब्लेडने हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पतीने नाक कापल्यानंतर जेव्हा तो कापलेला भाग शोधण्यासाठी गेला तेव्हा प्राण्यांनी तिचे नाक आधीच खाल्ले होते. या गंभीर प्रकरणानंतर आता महिलेची परिस्थिती बिकट झाली आहे.
Comments
Add Comment

मराठी चित्रपटात झळकणार सलमान आणि संजूबाबा; कोणती भूमिका करणार, पहा...

मुंबई : बॉलीवूड क्षेत्र गाजवणारा सलमान खान आता लवकरच मराठी सिनेमांमध्येही दिसणार आहे. सलमान खानच्या मराठी

पिझ्झा हटची पालक कंपनीचा 'यम' ब्रँड लवकरच विक्रीस?

प्रतिनिधी:पिझ्झा हट लवकरच विकला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पिझ्झा हटची

मी झोपलेली असताना तो माझ्या खोलीत आला... फराहने सांगितला तो किस्सा!

मुंबई : काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'टू मच' या चॅट शोमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेसह फराह खानने हजेरी लावली

Stocks to Buy Today: मोतीलाल ओसवालकडून चांगल्या रिटर्न्ससाठी 'हे' तीन शेअर खरेदी करण्याचा सल्ला

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर आज खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या शेअरची

कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेत अभियंत्यांसह विविध ३०० जागा…

नाशिक  : वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे मनुष्यबळ यांना तोंड देणाऱ्या नाशिक महापालिकेत स्थापत्य, यांत्रिकी,

मुंबई मेट्रोची तिकिटे मिळणार थेट ‘उबर ॲप’वरून

मुंबई : उबरने प्रथमच मुंबईमध्ये मेट्रो तिकिटिंग सुरू केली असून, आता मेट्रो लाईन १ (वर्सोवा-घाटकोपर)ची तिकिटे थेट