मोहित सोमण: फिजिक्सवाला लिमिटेड आयपीओला सेबीने मान्यता दिली होती. आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड निश्चित केला आहे. १०३ ते १०९ रूपयांचा प्राईज बँड निश्चित केल्यानंतर कंपनीच्या शेअरचे माफक मूल्यांकन केल्याची चर्चा सुरू झाली आहे. ३४८० कोटींचा आयपीओ ११ नोव्हेंबरपासून बाजारात दाखल होणार असून १३ नोव्हेंबरला तो बंद होईल. १४ तारखेला आयपीओचे वाटप (Allotment) पात्र गुंतवणूकदारांना होणार आहे. १८ नोव्हेंबरला बीएसई व एनएसईवर हा शेअर सूचीबद्ध (Listed) होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४९३३ रूपये (१३७ शेअर) गुंतवणूक अनिवार्य करण्यात आलेली आहे. १ रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या २८.४४ कोटी शेअरची विक्री करण्यात येईल. त्यातील ३१०० कोटीचे शेअर फ्रेश इशूसाठी उपलब्ध होतील तर उर्वरित ३.४९ कोटी शेअर म्हणजेच ३८० कोटींचे हे शेअर ऑफर फॉर सेल (Offer for Sale OFS) उपलब्ध असतील. Kotak Mahindra Capital Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे तर MUFG Intime India कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम करेल.
३१९२६६०५४ शेअरची विक्री आयपीओसाठी करण्यात येईल. त्यापैकी २८४४०३६६९ कोटीचा फ्रेश इशू असून उर्वरित ३४८६२३८५ शेअर ओएफएससाठी उपलब्ध असतील. दरम्यान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात शेअर मिळतील. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी ७५% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, १०% वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, १५% पर्यंत वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. तसेच अलख पांडे, प्रतीक बुब हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.
फिजिक्सवाल्लाह ही एक एडटेक कंपनी आहे जी जेईई, एनईईटी, यूपीएससी इत्यादी विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी चाचणी तयारी अभ्यासक्रम आणि डेटा सायन्स आणि अँनालिटिक्स, बँकिंग आणि फायनान्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इत्यादी अपस्किलिंग अभ्यासक्रम देते. ती सोशल मीडिया चॅनेल, वेबसाइट आणि अँप्सद्वारे ऑनलाइन सेवा देते आणि तंत्रज्ञानाने सक्षम ऑफलाइन केंद्रे आणि हायब्रिड केंद्रे देखील देते. भारतातील उत्पन्नाच्या बाबतीत ती टॉप ५ एडटेक कंपन्यांमध्ये आहे आणि १५ जुलै २०२५ पर्यंत YouTube वर त्याचे १.३७ कोटी सबस्क्राइबर आहेत.
कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ५१% महसूलात वाढ झाली आहे तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात ७८% वाढ झाली आहे. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२४ मधील निव्वळ तोटा २४३.२६ कोटी तोटा जून २०२५ मध्ये तिमाही बेसिसवर १२७.०२ कोटींवर घसरला आहे. ईबीटा (EBITDA) ही गेल्या तिमाहीतील १९३.२० कोटींच्या तुलनेत मात्र २१.२२ कोटीचा तोटा झाला आहे. प्री आयपीओ ईपीएस (Earning per share EPS) ०.९३% आहे तसेच पीई (Price to Earnings) ११६.८६ % आहे.
कंपनीने आपल्या डीएचआरपीत दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भांडवली खर्चासाठी, लिजिंग संबंधित भांडवली खर्चासाठी, इतर भांडवली खर्चासाठी, लिजिंग खर्चासाठी, स्वतःच्या उपकंपनीत गुंतवणूकीसाठी, आयटीतील खर्च व गुंतवणूकीसाठी, अधिग्रहणासाठी, व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी व इतर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.अ
फिजिक्सवाला ही एक एडटेक कोचिंग क्लासेस कंपनी आहे जी जेईई, एनईईटी, यूपीएससी इत्यादी विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी चाचणी तयारी अभ्यासक्रम आणि डेटा सायन्स आणि अँनालिटिक्स, बँकिंग आणि फायनान्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इत्यादी अपस्किलिंग अभ्यासक्रम देते. ती सोशल मीडिया चॅनेल, वेबसाइट आणि अँप्सद्वारे ऑनलाइन सेवा देते आणि तंत्रज्ञानाने सक्षम ऑफलाइन केंद्रे आणि हायब्रिड केंद्रे देखील विद्यार्थाना उपलब्ध करते. भारतातील उत्पन्नाच्या बाबतीत ती टॉप ५ एडटेक कंपन्यांमध्ये आहे आणि १५ जुलै २०२५ पर्यंत YouTube वर त्याचे १.३७ कोटी सबस्क्राइबर आहेत.