थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला लागला असून हळू हळू गरमीच्या ऋतूला सुरुवात होते आहे.


मुंबईत हवामान काही दिवस उष्ण आणि दमट राहणार असून तापमानाचा पारा ३२ अंशाच्या पार जाणार आहे, बदलत वातावरण, कोरड हवामान शिवाय हवेची खराब गुणवत्ता यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळी घ्यावी.


पुण्यातही हवापालट झाली आहे. हवामान कोरडे आणि उष्ण राहणार असून पारा हा ३३ अंशांपर्यत पोहोचणार आहे. सकाळी काहीसा गारवा तर दुपारी कडक ऊन पुणेकरांना येत्या काही दिवसात असे विचीत्र हवामान अनुभवायला मिळणार आहे.


 



 

उत्तर महाराष्ट्रात हवामान काही ठिकाणी हिटवेव्हचा अलर्ट देण्यात असून दिवसभर कडक ऊन आणि रात्री थंड वातावरण राहील आणि पारा ३४ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


मराठवाडा आणि विदर्भ तापमानाचा पारा हा ३६ अंधांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कडक उन्हामुळे हिटव्हेव सारखी गंभीर परिस्तिथी उदभवू शकते, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे.


वातावरण बदलत जात आहे, थंडी कमी होऊन आता उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात होते आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे.

Comments
Add Comment

Navnath Ban : MPSC पेपरफुटी प्रकरणावरून नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणावरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस

MPSC Paper Leak : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणात भाजप-शरद पवार गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा पेपरफुटी पेपरफुटीप्रकरणात भाजप

Jalgaon : हदयद्रावक ! झोका घेताना चिमुकल्याच्या गळ्याला दोरीचा फास लागला अन् क्षणात होण्याचं नव्हतं झालं

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद (Nashirabad) येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील झोपाळ्यावर खेळताना झोक्याच्या

Sunetra Pawar : पिंपळवंडी पीडित कुटुंबाच्या मदतीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी

पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा

Local Body Member Appointments : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

- ग्रामविकास विभागामार्फत अध्यादेश जारी; पंचायत समितीला २० टक्के, तर जिल्हा परिषदेसाठी १० टक्के कोटा

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ आणि ११ सप्टेंबरला धावणार 'मोदी एक्सप्रेस'

- गणेश भक्तांच्या सेवेसाठी गेल्या १४ वर्षांपासून उपक्रम; दादर रेल्वे स्थानकातून रेल्वे होणार मार्गस्थ मुंबई :