मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार, मंगळवारी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘बालगंधर्व रंगमंदिर, तळमजला, सभागृह, रस्ता क्रमांक २४ व ३२ च्या नाक्याजवळ, नॅशनल महाविद्यालयासमोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई’ येथे सकाळी ११ वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध झाल्यानंतर १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना सादर करता येतील,असे निवडणूक आयोगाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ‘बालगंधर्व रंगमंदिर, तळमजला, सभागृह, रस्ता क्रमांक २४ व ३२ च्या नाक्याजवळ, नॅशनल महाविद्यालयासमोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई’ येथे ही सोडत आयोजित करण्यात आली आहे.
त्यानंतर, शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. तर, शुक्रवार, १४ नोव्हेंबर ते गुरुवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान, सदर आरक्षणाच्या अनुषंगाने, हरकती व सूचना दाखल करण्यासाठी निवडणूक प्रभागाशी संबंधित कार्यालयाचा पत्ता आणि इतर तपशील मुंबई महागरपालिका संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCGE2025 या लिंकवर उपलब्ध आहे.