धक्कादायक! शिरुरमध्ये बालकावर बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी पेटवले वनविभागाचे कार्यालय

पुणे: शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली. यामुळे गावामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे, अशी चर्चा सुरु होती. यामुळे गावात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच याबाबतीत स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली होती. मात्र वन विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. दरम्यान १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना घडल्याने गावकऱ्यांचा वन विभागावर रोष वाढला. त्यांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली.




संतप्त नागरिकांनी बेल्हे-जेजुरी महामार्गावर रास्ता रोको देखील केला. तसेच मुलाचा मृतदेह सोबत घेऊन नातेवाईकांसह गावकऱ्यांनी आंदोलन केले. वन विभागाच्या कार्यालयासह गाडीदेखील पेटवण्यात आली. या जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर पिंपरखेड परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला आहे.

Comments
Add Comment

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच

आचरसंहिता लागू होताच रोकड जप्त! पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा

पुणे: महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील