मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. युट्यूबर अदनान शेखनं २०२४ मध्ये गर्लफ्रेंड रिद्धी जाधवसोबत लग्न केलेलं. मीडिया रिपोर्टनुसार, अदनानची गर्लफ्रेंड मराठी असून तिनं अदनानसोबत लग्न करण्यापूर्वी आपला धर्म बदलला होता. याबाबत एका मुलाखतीत बोलताना अदनानंही सांगितलेलं. रिद्धीनं धर्मासोबतच आपलं नावही बदललं होतं, तिनं आपलं नाव 'आएशा', असं ठेवलेलं. अदनानशी लग्न झाल्यापासून ती कायम बुरख्यात दिसते. यावरुन अनेकदा युट्यूबरला जोरदार ट्रोल करण्यात आलं. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना अदनाननं यावर मौन सोडलं आहे. तसेच, त्याला ट्रोल करणाऱ्यांना त्यानं सुनावलंही आहे.



पत्नीला बुरख्यात ठेवण्याबाबत युट्यूबर अदनान शेख काय म्हणाला?


युट्यूबर अदनान शेखची मराठमोळी पत्नी, जिनं हिंदू धर्मातून इस्लामचा स्वीकार केला आहे, ती आता सतत बुरखा आणि हिजाब परिधान करते. ती कधीच तिचा चेहरा दाखवत नाही. अगदी अदनानसोबत ज्यावेळी तिनं आपली लग्नगाठ बांधली, त्यावेळी संपूर्ण विवाह सोहळ्यादरम्यानही तिनं आपला चेहरा कोणालाही दाखवला नाही. यावरुन युट्यूबरला अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. अशातच एका मुलाखतीत बोलताना अदनान शेखनं यावर मौन सोडलं आहे.


'लेट्स टॉक विथ नमिता'शी बोलताना अदनान शेख याला पत्नीला बुरखा घालण्यासाठी सक्ती करण्यात आली का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अदनान शेख म्हणाला की, "त्यानं आपल्या पत्नीवर हिजाब परिधान करण्याची सक्ती केली होती का? यावर उत्तर देताना अदनाननं स्पष्टीकरण दिलंय. तो म्हणाला की, "लोकांना जे बोलायचं आहे, ते बोलू द्या... हे माझं आयुष्य आहे आणि मी ते माझ्या स्वतःच्या अटींवरच जगतो... ज्यांना या गोष्टीचा आक्षेप आहे, त्यांनी खुशाल त्यांना जे वाटतंय ते करावं, पण माझ्यापुरतं बोलायचं तर, जे लोक आपल्या पत्नींना 'पर्दा'मध्ये ठेवत नाहीत, त्यांना 'जन्नत' (स्वर्ग) प्राप्त होणार नाही, असे मी मानतो. मी मात्र माझ्या पत्नीला लोकांसमोर 'प्रदर्शित' करणार नाही. मी एक पुरुष आहे आणि इतर पुरुष स्त्रियांकडे कोणत्या नजरेनं पाहतात, हे मला चांगलंच ठाऊक आहे..."


अदनान शेख म्हणाला की, "आजच्या काळात लोक आपल्या पत्नीला आणि आईला प्रदर्शनाची वस्तू समजतात... अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास प्रवृत्त करतात... प्रत्येकाचं आयुष्य स्वतंत्र असतं आणि मृत्यूनंतर आपल्याला आपल्या कर्माचा हिशोब द्यावा लागणार आहे... मी माझे व्यवहार धर्माच्या चौकटीत राहून अत्यंत जबाबदारीनं पार पाडतोय..."


"आमच्या धर्मात असंही सांगितलं गेलंय की, पुरुष ज्या दृष्टीनं स्त्रियांकडे पाहतात, ती दृष्टी जर स्त्रियांना उमजली, तर त्या स्वतःला पूर्णपणे झाकून घेतल्याशिवाय घराबाहेर पाऊलही टाकणार नाहीत. श्रद्धा आणि ऐहिक जीवन या दोन्हीमध्ये समतोल राखण्याचा मी प्रयत्न करतोय...", असं अदनान शेख म्हणाला.



अदनाननं धर्मांतरासाठी पत्नीवर जबरदस्ती केली?


अदनान शेख त्याच्या लग्नापासूनच जोरदार ट्रोल होतोय. त्यानं एका मराठी मुलीशी आपली लग्नगाठ बांधलीय. अदनान शेखनं आपल्या पत्नीच्या धर्मांतराच्या चर्चांवरही काही दिवसांपूर्वी मौन सोडलं. अदनान शेख म्हणालेला की, त्यांच्या विवाहापूर्वीच त्याच्या पत्नीनं आपला धर्म बदला. भारतात प्रत्येकालाच स्वातंत्र्याचा अधिकार आहे, कोणालाही त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही. इथे हे नमूद करणं महत्त्वाचं आहे की, अदनानच्या पत्नीचं मूळ नाव 'रिद्धी' असं आहे, दरम्यान, लग्नाच्या वेळी तिनं धर्मांतर केलं आणि 'आएशा' हे नाव धारण केलं. लग्नानंतर ती सगळीकडे बुरख्यातच दिसते.




Comments
Add Comment

Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन

Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Barshi Crime : माता न तू वैरिणी! १० महिन्यांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या   सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Beed Pakistani Connection : बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; एटीएसची धडक कारवाई

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील