निर्यातदारांना निश्चिंत करण्यासाठी पंतप्रधान मोदीचे धोरणात्मक पाऊल आज व्यापाऱ्यांना भेटणार

नवी दिल्ली: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच निर्यातदारांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज निर्यातदारांना किंवा काही कामगार-केंद्रित क्षेत्रांना भेटणार आहेत.जागतिक व्यापारात देशाची स्पर्धात्मकता वाढवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करतील. वस्त्रोद्योग, चामडे, रत्ने आणि दागिने, हस्तकला, अभियांत्रिकी आणि समुद्री खाद्य यासारख्या क्षेत्रांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील असे वृत्तसंस्थेने सांगितले आहे.


या क्षेत्रांच्या निर्यात प्रोत्साहन परिषदेचे प्रमुख या बैठकीत उपस्थित राहतील. माहितीनुसार,काही क्षेत्रे वगळता अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेल्या ५०% वाढीव शुल्कामुळे (Tariff) कामगार-केंद्रित क्षेत्रांना आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने ही बैठक महत्त्वाची मानली जाते. वस्तू आणि सेवांच्या स्पर्धात्मकतेत आयात शुल्क किंवा शुल्क महत्त्वाची भूमिका बजावतात.भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करत आहेत.


आकडेवारीनुसार जागतिक व्यापारात भारताचा वाटा सुमारे २% आहे ज्यात जागतिक वस्तू निर्यातीत १.६% आणि सेवांमध्ये ३.३% यांचा समावेश आहे.सप्टेंबरमध्ये भारताची निर्यात ६.७४% वरुन वाढत ३६.३८ अब्ज डॉलर्स झाली, तर आयात १६.६% वाढली. यामुळे व्यापार तूट ३१.१५ अब्ज डॉलर्स झाली होती. ती परिस्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष प्रयत्न करतील.जागतिक आव्हानांना न जुमानता या वर्षी एप्रिल-सप्टेंबर दरम्यान,माहितीनुसार,एकूण निर्यात ३.०२% वाढून २२०.१२ अब्ज डॉलर्स झाली तर आयात ४.५३%% वाढून ३७५.११ अब्ज डॉलर्स झाली, ज्यामुळे व्यापार तूट १५४.९९ अब्ज डॉलर्स झाली होती.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांना अजूनही काही नेते सोडून जाण्याची भीती, जाहीर सभेत बोलून दाखवले हे शब्द..

  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी पुढे कोण सोबत राहील आणि

बडोद्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 'विराट' विजय

बडोदा : भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त

शिवसेना–भाजप–रिपाईला बहुमत द्या, महापालिकेवर भगवा फडकवा

मुंबईचा थांबलेला विकास पुन्हा सुरू; घर, रस्ते आणि योजनांवर शिंदेंचा ठाम भर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका कायम; २३ आठवडे सलग दरवाढ, चिकन-भात सामान्यांच्या आवाक्याबाहेर

कराची : पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अजूनही सुधारण्याची कोणतीही ठोस चिन्हे दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय

'जैश - ए - मोहम्मद'चा म्होरक्या महसूर अजहरचा ऑडिओ व्हायरल; सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली

इस्लामाबाद : भारतविरोधी आक्रमक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या हालचाली