भाजप आमदार मंदा म्हात्रे रुग्णालयात

बेलापूर : बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून दोन स्टेंट बसवले असून आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मंदा म्हात्रे यांचे पुत्र निलेश म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तब्येतीबाबतची ताजी माहिती दिली आहे.


आमदार मंदा म्हात्रे रुग्णालयात असल्याचे कळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोबाईलवरून मंदा म्हात्रे यांच्या मुलाशी बातचीत केली. मंदा म्हात्रे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.


मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील एक सक्रिय व प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. बेलापूर मतदारसंघातून त्या विधानसभेत प्रतिनिधित्व करत असून, स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि मच्छीमार समाजातील प्रश्नांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईतील अनेक सामाजिक कार्यक्रम, शासकीय योजना आणि स्थानिक पातळीवरील विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. बेलापूर आणि आसपासच्या भागातील नागरी सुविधांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला आहे.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत