उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; देशस्थिती, महाराष्ट्रातील प्रश्नांवर सखोल चर्चा

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत इराण-इस्रायल तणाव, देशांतर्गत परिस्थिती तसेच महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय झाला.


युद्धजन्य परिस्थितीत ‘एनडीए’चा घटक पक्ष म्हणून शिवसेना पंतप्रधानांच्या भूमिकेसोबत ठामपणे उभी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “देश प्रथम” हीच भूमिका कायम ठेवत आम्ही केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.


बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात खोटा प्रचार करून राजकारण करणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. काही नेते पाकिस्तानमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी वक्तव्य करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.


युद्धस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणल्याची माहिती शिंदे यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच होर्मुज सामुद्रधुनीतून भारताची तेलवाहतूक सुरक्षितपणे पार पडण्यासाठी केंद्राने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी आभार मानले.


राज्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. गॅस टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर त्यांनी विरोधकांना धारेवर धरत राज्यात कुठेही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले. काळाबाजार रोखण्यासाठी सरकार दक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.


दरम्यान, राज्यसभेत डॉ. ज्योती वाघमारे यांच्या बिनविरोध निवडीचेही त्यांनी स्वागत केले. शिवसेना खासदारांनी सभागृहात ठाम भूमिका मांडावी, असे निर्देशही त्यांनी दिले.


या भेटीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिलिंद देवरा, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे आणि रवींद्र वायकर उपस्थित होते.


तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि पियूष गोयल उपस्थित होते. संसदीय कार्यमंत्री रिजीजू यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या संसदीय कामकाजातील योगदानाची दखल घेतली.

Comments
Add Comment

Nashik Crime : तरुणाचा गळा आवळून खून, परिसरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात महिलांना रोजगाराची मोठी संधी ! ९ हजारांहून अधिक बचत गटांचा सहभाग

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गट आणि एकल महिलांसाठी

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Nashik : सिंहस्थाच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज ! ‘कुंभ भक्ती संगम’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Simhastha Kumbh Mela) सांस्कृतिक नांदी आजपासून होत

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल