असीम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवले

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचा कठोर निर्णय; २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला


मुंबई : न्यायव्यवस्थेबद्दल वादग्रस्त विधान करणे प्रसिद्ध वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांना चांगलेच महागात पडले आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा (BCMG) यांनी त्यांची वकिलीची सनद तब्बल तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. एवढेच नाही, तर त्यांच्यावर २५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. या निर्णयामुळे कायदेविषयक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात अ‍ॅड. सरोदे यांनी न्यायव्यवस्था, राज्यपाल (Governor) आणि विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली होती. या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला असून न्यायालयांविषयी नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.


या प्रकरणी १९ मार्च २०२४ रोजी बार कौन्सिलकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती. अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या तक्रारीची दखल घेत सखोल चौकशी केली आणि त्यानंतर हा मोठा निर्णय घेतला.


विशेष म्हणजे, बार कौन्सिलने अ‍ॅड. असीम सरोदे यांना आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लेखी माफी मागण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांनी ही संधी नाकारल्यामुळे त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.


या कारवाईमुळे अ‍ॅड. सरोदे यांना पुढील तीन महिने कोणत्याही न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही. अ‍ॅड. सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीत सहभागी असणारे वकील आहेत. अशा परिस्थितीत त्यांची सनद रद्द झाल्यामुळे या खटल्याच्या पुढील प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


बार कौन्सिलने घेतलेल्या या निर्णयामुळे वकिलांच्या सार्वजनिक वादग्रस्त वक्तव्यांबाबत त्यांची भूमिका किती कठोर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. न्यायव्यवस्थेचा मान राखणे प्रत्येक वकिलासाठी किती महत्त्वाचे आहे, याचा संदेश यातून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

हापूस आंबा बाजारात आला, असा झाला पहिला सौदा!

कोल्हापूर : समितीचे श्री शाहू मार्केट यार्डमधील जावेद इब्राहिमभाई बागवान यांच्या जे बी अँड सन्स फळ विभाग गाळा

खडसेंच्या घरी चोरी करणारे सापडले; ती 'सीडी' नेमकी आहे कुठे?

जळगावच्या चोरीचे धागेदोरे उल्हासनगरपर्यंत; सोनार आणि दोघांना अटक, मुख्य आरोपी अद्याप फरार जळगाव : राष्ट्रवादी

तृतीयपंथी समाज पुन्हा एकदा राजकारणात नवा अध्याय लिहिणार!

निवडणुकीत तृतीयपंथीयांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे - मैत्री संघटना, तृतीयपंथीयांची मागणी कोल्हापूर : स्थानिक

Breaking News : पोलीस महासंचालक पदासाठी ‘या’ ७ अधिकाऱ्यांची नावे 'शॉर्टलिस्ट'; सदानंद दातेंसह ‘हे’ आयपीएस शर्यतीत!

राज्याच्या गृहविभागाकडून UPSCकडे नावांची यादी रवाना; रश्मी शुक्ला ३१ डिसेंबरला निवृत्त होणार मुंबई :

Satyajeet Tambe : सत्यजित तांबे अखेर भाजपच्या उंबरठ्यावर? मामा बाळासाहेब थोरातांनीच दिले 'ग्रीन सिग्नल'; म्हणाले, 'तो सज्ञान...

अहिल्यानगर : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष

धक्कादायक! शिरुरमध्ये बालकावर बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी पेटवले वनविभागाचे कार्यालय

पुणे: शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलाचा दुर्दैवी