RO-RO Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल्ल' बुकिंग

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ!


मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद 'एम-टू-एम' रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. उद्या, रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता मुंबईतील भाऊचा धक्का येथे या सेवेचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर ही बोट विजयदुर्गकडे प्रस्थान करणार असून, या प्रवासासाठी प्रवाशांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. पहिल्याच दिवशी विविध श्रेणींमधून जवळपास सर्वच तिकीट बुकिंग होत आली आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे की, सुमारे ६२६ प्रवासी आणि मोठ्या संख्येने वाहने वाहून नेण्याची क्षमता असलेले हे अत्याधुनिक रो-रो जहाज मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर अवघ्या ६ ते ७ तासांत पूर्ण करणार आहे. सुरक्षित आणि आरामदायी समुद्रप्रवासासोबतच पर्यटकांना कोकणचा विस्तीर्ण निसर्गरम्य समुद्रकिनारा अनुभवण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. ही सेवा महाराष्ट्राच्या सागरी वाहतुकीच्या इतिहासातील एक नवीन आणि वैभवशाली अध्याय ठरणार असून, भविष्यात या सेवेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. कोकणाला वेगवान कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आणि राज्याच्या सागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर प्रत्यक्षात साकार झाला आहे. या प्रतिसादाबद्दल बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, कोकणवासीयांनी या सेवेचे केलेले स्वागत हे या प्रकल्पाच्या यशाची पावती आहे. या सेवेमुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळेल. उद्याच्या पहिल्या फेरीसाठी झालेल्या बुकिंगच्या तपशिलानुसार, सर्वाधिक पसंती इकोनॉमी श्रेणीला मिळाली असून प्रीमियम श्रेणी, बिझनेस श्रेणी आणि प्रथम दर्जा (फर्स्ट क्लास) श्रेणीत देखील प्रवाशांनी आपले स्थान आरक्षित केले आहे.


प्रवाशांच्या सोयीसाठी ₹३,००० पासून ₹९,००० पर्यंतचे विविध तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. केवळ प्रवासीच नव्हे तर वाहनांच्या वाहतुकीसाठीही या सेवेला उत्तम प्रतिसाद लाभला असून, पहिल्याच दिवशी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. या प्रतिसादावरून मुंबई-कोकण प्रवासासाठी ही सेवा किती आवश्यक आहे हे स्पष्ट होते.

Comments
Add Comment

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी