राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार


मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित वाढवण बंदर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरणार आहे. या बंदराला रस्ता, रेल्वे आणि वायुमार्गाने प्रभावीपणे जोडण्यासाठी समन्वयित पावले उचलली जात आहेत. वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यासाठी तातडीने जागा निश्चिती करण्यात यावी, तसेच राज्यातील विविध विमानतळांच्या विकासकामांना कालबद्ध गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


विधिमंडळातील समिती कक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणच्या संचालक मंडळाची ९३ वी बैठक पार पडली. बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष स्वाती पांडेय, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विजय सिंघल तसेच मिहानचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन विटणकर उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोली जिल्हा देशातील महत्त्वपूर्ण स्टील उद्योग केंद्र म्हणून विकसित होत असून, या औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठी तेथे लवकरच ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे वाढती वाहतूक आणि लॉजिस्टिक गरजा लक्षात घेता आधुनिक विमानतळ सुविधा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


बैठकीत नांदेड, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील कार्यरत विमानतळांच्या सुविधा विस्तार व आधुनिकीकरणाचा आढावा घेण्यात आला. प्राधिकरणाच्या वतीने राज्यातील नऊ विमानतळांच्या विकासकामांबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.



मिहान विकासासाठी ५९७ कोटींची मंजुरी; २९७ कोटी वितरित :


मिहान येथे अनेक उद्योग व प्रकल्प कार्यान्वित झाले असून, पतंजली आयुर्वेदचाही प्रकल्प सुरू झाला आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर, कमर्शियल कॉम्प्लेक्स, महाराष्ट्र अॅग्रो डेव्हलपमेंट कंपनी, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर, सेझबाह्य क्षेत्रातील हेल्थकेअर सुविधा, कार्गो हब आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई-व्ही चार्जिंग स्टेशन यांसारख्या प्रकल्पांची माहिती यावेळी देण्यात आली.


मिहानच्या सर्वांगीण विकासासाठी ५९७ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी २९७ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १२ कोटी ३८ लाख रुपये खर्चाचा ३९ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प उभारण्यात येत आहे. शिवणगाव आणि वित्तुबाबानगर परिसरातील पायाभूत सुविधांसाठी ९९ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.


राज्यातील विमानतळ व औद्योगिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणामुळे गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम