मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या क्षणाची चाकरमानी आतुरतेने वाट पाहत होते, तो ऐतिहासिक क्षण अखेर उजाडला आहे. मुंबई ते विजयदुर्ग या जलवाहतूक सेवेचा आज, १ मार्च रोजी 'श्रीगणेशा' होत असून, यामुळे कोकणच्या दळणवळण क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला जात आहे.


एकेकाळी मुंबई आणि कोकणाला जोडणारी जलवाहतूक एका दुर्दैवी अपघातानंतर खंडीत झाली होती. मात्र, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वप्न पुन्हा सत्यात उतरले आहे. आज सकाळी मुंबईतील ऐतिहासिक भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ) येथून मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'रोरो' रवाना होईल. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना हा प्रकल्प कोकणच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.



७ तासांत विजयदुर्ग गाठणे शक्य


 

रस्ते वाहतुकीतील समस्या आणि रेल्वे आरक्षणाची अडचण लक्षात घेता, ही जलवाहतूक सेवा कोकणवासीयांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या सेवेसाठी 'एम२एम प्रिन्सेस' हे आधुनिक जहाज चालवले जाणार असून, एका फेरीमध्ये ६२० प्रवासी आणि ३५ वाहने नेण्याची त्याची क्षमता आहे. या जहाजामुळे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्गला पोहोचता येईल. प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत बोटीवर डॉक्टरांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.




वेळापत्रक आणि नियोजन


 

- मुंबईहून प्रस्थान : दर बुधवारी व शनिवारी सकाळी ८.०० वाजता.


- विजयदुर्गहून प्रस्थान : दर गुरुवारी व रविवारी दुपारी १२.०० वाजता.




तिकीट दर असे


 

- इकॉनॉमी - ३,०००


- प्रीमियम इकॉनॉमी - ५,०००


- बिझनेस - ७,०००


- फर्स्ट क्लास - ९,०००




वाहनांसाठी शुल्क (कार)


 

एक्सएल (अतिरिक्त मोठी) - ९,०००


एल (मोठी) - ८,०००


एम (मध्यम) - ७,०००


एस (लहन) - ६,०००


दुचाकी - १,०००


सायकल - ६००




बुकींग कुठे कराल?


 

www.m2mferries.com, https://www.m2mferries.com या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करता येईल.

Comments
Add Comment

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी ‘मिशन मोड’वर काम करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण विभागाने

BMC Students ISRO Visit : मुंबई महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ISRO, सिंगापूर किंवा जपानचा अभ्यास दौरा; आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे ढिग तसेच!

- पुन्हा कंपनीला वाढवून दिला एप्रिल २०२७ पर्यंत कालावधी मुंबई (सचिन धानजी) मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचरा हटवून

BMC News : मुंबई महापालिका भाडेपट्ट्याने दिलेल्या जागा देणार मालकी हक्काने जागा

- शासनाच्या धर्तीवर धोरण बनवण्याचा ठराव मंजूर मुंबई ( विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर, बृहन्मुंबई

BMC Parks Photography : महापालिकेची उद्याने आता छायाचित्रणाच्या दृष्टीकोनातून विकसित; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील प्रमुख सार्वजनिक उद्याने व बागांमध्ये

Mumbai Smart Turf Policy : मुंबईत महापालिकेद्वारे 'अॅडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण?

- खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार बुकिंग आणि विषारी रबर कणांवर येणार बंदी. - भाजप नगरसेवक ताजिंदरसिंग तिवाना यांची