Punjab Crime : पार्किंगमध्ये कार धडकली अन् धाड धाड... २६ वर्षीय तरुण कबड्डीपटूची भरदिवसा निर्घृण हत्या

पंजाब : पंजाबच्या लुधियानामधील जगरांव येथे शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे तेजपाल सिंग (Tejpal Singh) नावाच्या २६ वर्षीय कबड्डीपटूवर (Kabaddi Player) दिवसाढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. हे हत्याकांड जगरांव येथील हरी सिंह रुग्णालय रोडवर घडून आले. विशेष म्हणजे, ही घटना एसएसपी ऑफिसच्या (SSP Office) अगदी २०० मीटर अंतरावर घडल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस तपास सुरू आहे.



जुन्या वादातून कबड्डीपटू तेजपाल सिंगची गोळ्या झाडून हत्या


मिळालेल्या माहितीनुसार, तेजपाल सिंग हे आपल्या दोन मित्रांसोबत हरि सिंह रोडवर असलेल्या एका कंपनीजवळून जात असताना, जुन्या वादातून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तेजपाल आणि समोरच्या गटात सुरुवातीला वाद झाला, जो नंतर विकोपाला गेला. याच वेळी, समोरच्या गटातील एका व्यक्तीने तेजपालच्या छातीवर पिस्तूल धरून गोळीबार केला. गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या तेजपाल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या घटनेमागील कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.



पार्किंगमध्ये कार धडकल्याने वाद विकोपाला


कबड्डीपटू तेजपाल सिंग (Tejpal Singh) यांच्या हत्येनंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तातडीने छापेमारी सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर हा जगरांव गावाजवळील रुमी या गावातील रहिवासी आहे. हल्लेखोर दोन वाहनांमध्ये बसून घटनास्थळी आले होते, असे बोलले जात आहे. कबड्डीपटू तेजपाल सिंग आपल्या कारमध्ये बसून जात असताना, पार्किंगमध्ये तेजपाल यांची कार आणि आरोपीच्या वाहनाला धडकली. या धडकेनंतर त्यांच्यात वाद चालू झाला, जो नंतर गोळीबारापर्यंत पोहोचला. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस घटनास्थळाच्या आसपास असणारे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासत आहेत, जेणेकरून आरोपींचा माग काढता येईल.



'२० मिनिटे मारले अन्...


तेजपाल यांची कार समोरच्या कारला धडकल्यानंतर, दोन कारमधून एकूण सात ते आठ तरुण बाहेर आले. त्यांनी कबड्डीपटू तेजपाल यांना मारण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे, हे तरुण साधारण वीस मिनिटे कबड्डीपटूला मारहाण करत होते. त्यानंतर, यातीलच एका तरुणाने पिस्तूल काढून तेजपाल यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनेच्या ठिकाणाहून पळून गेले. मृत कबड्डीपटू तेजपाल हे जिल्हा स्तरीय सामने खेळलेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ओळख पटली असून, त्यांचा शोध चालू आहे.

Comments
Add Comment

अमेरिकन व्हिसा पाहिजे, तर साडेतेरा लाख जमा करा !

व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज

उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदारांची सखोल तपासणी

आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Hydrabad Crime : अमेरिकेत हैदराबादच्या लेकीची निर्घृण हत्या; संशयित माजी रूममेट भारतात पळाला, तामिळनाडूत अटक

हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय

चोरीसाठी शिरला, पण नशीब फिरलं! दोन दिवस भिंतीत अडकलेला चोर, VIDEO व्हायरल

चोरीसाठी चोर कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा काही अंदाज नाही. मात्र राजस्थानमध्ये चोरा सोबत असं काही घडलं की त्याला

लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणात एनआयएचा तपास वेगात; नऊ आरोपी अटकेत

नवी दिल्ली : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.