भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे


नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला आहे. पण या संकट काळातही इराणने भारतासाठी मैत्रीचा हात पुढे केला आहे. ‘भारत आमचा मित्र आहे व त्यांच्या जहाजांना कोणताही धोका पोहोचणार नाही,’ असे इराणने स्पष्ट केले आहे.


'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून भारतीय जहाजांना सुरक्षित रस्ता देण्याची घोषणा इराणच्या राजदूतांनी केली आहे. राजदूतांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढता दबदबा आणि इराण-भारत संबंधांच्या मजबुतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारा एक अरुंद पण मोक्याचा जलमार्ग आहे. भारतासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला मिळणाऱ्या एकूण कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गावरून येतो. भारताची अनेक व्यापारी जहाजे याच मार्गाने आखाती देशांकडे रवाना होतात.

Comments
Add Comment

'Vande Mataram' Mandatory in Madrasas : बंगाल सरकारचा मोठा निर्णय; आता बंगालमधील मदरशांमध्ये ‘वंदे मातरम’ गायन अनिवार्य

कोलकाता : पश्चिम बंगालमधील शुभेंदू सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बंगाल सरकारच्या अल्पसंख्याक कार्य आणि

Bengaluru Airport : बंगळूरु विमानतळावर मोठा अपघात टळला! लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाची धावपट्टीला धडक, १७९ प्रवासी थोडक्यात बचावले

बंगळुरू : दिल्लीहून बंगळूरुला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक

Weather Update IMD Alert : पुढील १५ तास धोक्याचे! १७ राज्यांमध्ये वादळी पाऊस, तर उत्तर भारतात उष्णतेचा कहर

उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील १७ राज्यांसाठी मोठा हवामान

Cockroach Janta Party : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी 'कॉकरोच जनता पार्टी' खऱ्या राजकारणात उतरणार? संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं!

सध्या इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या दुनियेत एका अत्यंत अनोख्या नावाची तुफान चर्चा रंगली आहे, ते नाव म्हणजे

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड ‘लंगडा’; पाकिस्तानातून चाललं संपूर्ण ऑपरेशन, NIA चा मोठा खुलासा

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी NIA च्या चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासे झाले असून, संपूर्ण कट

PM Narendra Modi : परदेश दौऱ्यावरून परतताच मोदींची तातडीची बैठक; पेट्रोल-एलपीजीवर मोठा निर्णय?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. जवळपास वर्षभरानंतर होत असलेल्या