डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश


मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन येत्या ६ डिसेंबर २०२५ रोजी आहे. या अनुषंगाने दादर (पश्चिम) परिसरातील चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा - सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.भूषण गगराणी यांनी संबंधित अधिकारी आणि खात्यांना दिले आहेत. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व नागरी सोयी-सुविधा योग्यप्रकारे मिळतील, यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी – कर्मचारी आणि सर्व संबंधितांनी विशेष खबरदारी घ्यावी व सजगतेने कार्यतत्पर राहून नेमून दिलेली कार्ये वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही गगराणी यांनी दिल्या. तसेच चैत्यभूमीसह संबंधित परिसरांमध्ये सर्व सोयी-सुविधा पुरविण्यास बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे गगराणी यांनी आवर्जून नमूद केले.


महापरिनिर्वाण दिन पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित विशेष आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह महानगर आयुक्त आस्तिककुमार पांडेय, मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


आढावा बैठकीदरम्यान संवाद साधताना आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, महानगरपालिकेद्वारे दादर येथील चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात अधिक दर्जेदार सेवा - सुविधा पुरविण्यात येतील. आवश्यकता असेल, त्या ठिकाणी अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी बैठकी दरम्यान संबंधितांना दिले. तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात सुयोग्य समन्वय साधून कार्यवाही करावी, अधिकाधिक प्रभावीपणे सेवा-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे आदेशही आयुक्त महोदयांनी यावेळी दिले.


उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांनी प्रास्ताविक करताना महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. प्रामुख्याने चैत्यभूमी स्मारक, तोरणा प्रवेशद्वार, अशोक स्तंभ, भीमज्योत व परिसराची रंगरंगोटी, उद्यान परिसराचे सुशोभीकरण, अभिवादनाकरिता पुष्पचक्र, टेहळणी मनोरा, नियंत्रण कक्ष, भागोजी कीर स्मशानभूमी येथे अनुयायांच्या रांगेकरिता दुतर्फा पडदे, स्थळ निर्देशक फुगा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत व आसन व्यवस्था, पोलीस खात्यामार्फत शासकीय मानवंदना, पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व वितरण, अनुयायांकरिता तात्पुरत्या स्वरूपात जल प्रतिबंधक (वॉटरप्रुफ) निवासी मंडप, चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात माहिती व दिशादर्शक फलक लावणे, मैदानामध्ये धूळ-प्रतिबंधक व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, वैद्यकीय सेवा-सुविधा, भोजन मंडपाची व्यवस्था, मा. भंतेजींकरिता ध्यान साधना शिबिर कक्ष, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, अग्निशमन दल व्यवस्था, भ्रमणध्वनी (मोबाईल) चार्जिंग सुविधा इत्यादी बाबींची माहिती सपकाळे यांनी दिली.


भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर, डॉ. भदंत राहूल बोधी – महाथेरो यांच्यासह सर्वश्री. नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, गौतम सोनवणे, रमेश जाधव, प्रतीक कांबळे, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, इतर मान्यवर देखील उपस्थित होते.

Comments
Add Comment

विक्रोळी ते भांडुप मध्ये सोमवारपासून ८७ तासांचा पाणीब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

BJP News : भाजपचा उबाठासह शरद पवारांना पुन्हा दणका! माजी आमदार सुरेश भोईर, संजोग वाघेरेंच्या हाती कमळ

शरद पवारांच्या आमदराचा मुलगा भाजपमध्ये दाखल मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच,

मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार, आरोपीला ६ तासांत अटक

मालाड : मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

विक्रोळीत उबाठाचे खाते रिकामेच राहणार?

िचत्र पालिकेचे : विक्रोळी िवधानसभा सचिन धानजी मुंबई : विक्रोळी विधानसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून येत उबाठा

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेवर येत्या रविवारी २१ डिसेंबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात

Nagpur News : नागपूर हादरले! बुटीबोरी एमआयडीसीत भीषण दुर्घटना, ६ कामगारांचा मृत्यू

मृतांच्या वारसांना ३५ लाखांची मदत जाहीर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी