आरबीआयचा जन स्मॉल फायनान्स बँकेला दणका ४% बँकेचा शेअर कोसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण: जन स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर आज इंट्राडे ओपनिंगला ४% हून अधिक पातळीवर कोसळला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी स्पष्ट केले आहे की, जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने त्यांच्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे स्वैच्छिकपणे युनिव्हर्सल बँकेत संक्रमणासाठी केलेला अर्ज परत आरबीआयने केला आहे. बेंगळुरू स्थित असलेल्या या बँकेने या वर्षी जूनमध्ये लघु वित्त बँकेतून युनिव्हर्सल बँकेत संक्रमणासाठी अर्ज केला होता. बँकेच्या वाढीसाठी संचालक  मंडळाने हा निर्णय घेतला होता. ५ डिसेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या खाजगी क्षेत्रातील लघु वित्त बँकांच्या 'ऑन टॅप' परवान्यासाठी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बँकेने कथितपणे करत २६ एप्रिल २०२४ रोजी लघु वित्त बँकांचे युनिव्हर्सल बँकांमध्ये स्वैच्छिकपणे संक्रमण करण्याबाबत आरबीआयच्या परिपत्रकानुसार हा अर्ज करण्यात आला होता.


आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, युनिव्हर्सल बँकेत संक्रमण (Transformation) करू इच्छिणाऱ्या लघु वित्त बँकेला गेल्या तिमाहीत किमान १००० कोटी रुपये निव्वळ मूल्य राखणे, गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये निव्वळ नफा असणे, ३% किंवा त्यापेक्षा कमी एकूण एनपीए (Non Performing Assets NPA) म्हणजेच अनुत्पादक मालमत्ता प्रमाण तसेच गेल्या दोन आर्थिक वर्षांत १% किंवा त्यापेक्षा कमी निव्वळ एनपीए प्रमाण असणे आवश्यक असते. मात्र हे प्रमाण राखण्यासाठी बँकेला यश मिळाले नाही.


सप्टेंबर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा (Net Profit ) इयर ऑन इयर बेसिसवर २२.५% ने घसरून ७४.९ कोटी रुपये झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, निव्वळ एनपीए ०.९४% वर स्थिर होता आणि एकूण एनपीए मागील तिमाहीत २.९१% वरून २.८७% पर्यंत वाढला आहे.निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income NII) ४% वाढून ६१८ कोटी रुपये झाले आहे. कंपनीने मायक्रोफायनान्सवर लक्ष केंद्रित करणारी एनबीएफसी म्हणून सुरुवात केली त्यानंतर परवाना मिळाल्यावर एनबीएफसीचे बँकेत रूपांतर झाले होते. त्यामुळे मार्च २०१८ मध्ये स्मॉल फायनान्स बँक सुरू करण्यात आली.


आता मंजुरी न मिळाल्यामुळे वाढीच्या महत्त्वाकांक्षांवर परिणाम होऊ शकतो आणि जन स्मॉल फायनान्स बँकेचे मूल्यांकन पुनर्मूल्यांकन सुरू होऊ शकते. नजीकच्या काळात मुख्य एसएफबी ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये, एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला युनिव्हर्सल बँकेत रूपांतरित होण्यासाठी आरबीआयची तत्वतः मान्यता मिळाली.


माहितीनुसार, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडची मंजुरी प्रलंबित आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौटियाल यांनी अलीकडेच सांगितले की बँक डिसेंबरपर्यंत आरबीआयकडून निर्णय घेण्याची आशा करत आहे. लघु वित्त बँकांनी यापूर्वी मध्यवर्ती बँकेला त्यांच्या नावातून 'स्मॉल' हा शब्द वगळण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती जेणेकरून त्यांना चांगल्या ठेवी जमा करता येतील. तथापि, नियामकाने (Regulator) ही विनंती नाकारली आहे, त्याऐवजी परवाना मार्ग खुला ठेवला आहे असेही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. सकाळी १०.४० वाजेपर्यंत बँकेचा शेअर १.९६% कोसळत ४४८.५५ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. गेल्या ६ महिन्यात बँकेच्या शेअरमध्ये १३.१८% घसरण झाली आहे. तर वर्षभरात ०.४५% वाढ शेअरने नोंदवली आहे. इयर टू डेट (YTD) मूल्यांकनात मात्र ११.०८% वाढ नोंदवली आहे.

Comments
Add Comment

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

- मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ला सुरुवात; सहकार्य, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.