Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ


मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील जुन्या इमारतींमध्ये पावसाचे 'रेनवॉटर हार्वेस्टिंग', घनकचरा व्यवस्थापन तसेच गाळ व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यासाठी परवानगी देण्याची विशेष कार्यपद्धती राज्य सरकारने निश्चित केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जुन्या इमारतींमध्ये नवीन नळजोडणी आणि जलनिस्सारण जोडणी (ड्रेनेज कनेक्शन) यांसारख्या आवश्यक सुविधा मिळवण्याचा मार्ग आता अधिक सुलभ होणार आहे. (Guidelines for Rainwater Harvesting)


नगरविकास विभागाने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, जुन्या इमारतींमध्ये नवीन नळजोडणी किंवा जलनिस्सारण जोडणीसाठी अर्ज करताना संबंधित इमारतीची मूळ बांधकाम परवानगी आणि वैध स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र (इमारत सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र) सादर करणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा किंवा जैव-गाळ व्यवस्थापनासाठी इमारतीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे का, या नवीन व्यवस्थेमुळे संबंधित इमारतीला किंवा परिसरातील इतर इमारतींना कोणताही धोका निर्माण होणार नाही ना, तसेच आधीपासून असलेल्या नळ, जलनिस्सारण, वीज आणि गॅस जोडण्यांना कुठलेही नुकसान होणार नाही ना, याची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. (Guidelines for Rainwater Harvesting)



या संपूर्ण प्रक्रियेची आणि कागदपत्रांची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या अभियंत्यांवर टाकण्यात आली आहे. बांधकाम परवानगी, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र, उपलब्ध जागा आणि प्रस्तावित व्यवस्थेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अभियंता आपला अहवाल सादर करेल. या अहवालात कोणत्याही बाबीबाबत नकारात्मक निष्कर्ष निघाल्यास, योग्य कारण नमूद करून प्रशासनाला ही परवानगी नाकारता येणार आहे. मात्र, अभियंत्याचा अहवाल पूर्णपणे समाधानकारक असल्यास, अर्जदाराकडून भविष्यात या कामामुळे कोणतीही अडचण किंवा नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारण्याचे एक बंधपत्र (बॉंड) लिहून घेतले जाईल. (Guidelines for Rainwater Harvesting)



'हे' नियम बंधनकारक :


इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग किंवा घनकचरा व जैव-गाळ व्यवस्थापनाची यंत्रणा प्रत्यक्ष उभारल्यानंतर अभियंता पुन्हा एकदा त्या जागेची पाहणी करेल आणि काम योग्यरीत्या पूर्ण झाल्याचा अंतिम अहवाल देईल. या अंतिम अहवालाच्या आधारावरच सक्षम प्राधिकाऱ्याकडून इमारतीला नवीन नळजोडणी, जलनिस्सारण जोडणी किंवा तत्सम नागरी सुविधा देण्यास मंजुरी दिली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युडीसीपीआर) आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) मधील संबंधित तरतुदींचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. (Guidelines for Rainwater Harvesting)

Comments
Add Comment

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

- मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ला सुरुवात; सहकार्य, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई