कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून मुंबई महानगरपालिकेने त्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचेकडे केली. दरम्यान, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून त्याबाबतची माहिती न्यायालयाकडे सादर करण्यात येईल, असे गगराणी यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.


मुंबई महानगरात ठिकठिकाणी असणारे कबुतरखाने न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. तसेच, कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये हरकती तथा सूचना मागविण्याची कार्यवाहीही महानगरपालिका प्रशासनाने केली.


या सर्व पार्श्वभूमीवर श्री मुंबई जैन संघ संगठनचे नितीन व्होरा, मुकेश जैन, अतुल शहा, विजय जैन, अध्यात्म परिवाराचे हितेश मोटा आदींच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची मंगळवारी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भेट घेतली. मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये अशा जागांचा शोध घ्यावा की जिथे कबुतरांना दाणे पुरवता येतील आणि नागरिकांनाही कबुतरखान्यांचा त्रास होणार नाही, अशी प्रमुख मागणी या शिष्टमंडळाने केली.


मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अशा पर्यायी जागांचा शोध घेण्यात येईल. तसेच, या कबुतरखान्यांची बाब न्यायप्रविष्ट असल्याने अशा पर्यायी जागांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असे गगराणी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments

संजय धुवाळी    October 30, 2025 02:03 AM

यावर एकच उपाय आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी टॉवर उभे आहेत त्या टॉवरच्या टेरेस वर कबुतर खाना उपलब्ध होऊ शकतो.आणि जैन समजला बाहेर जाण्याचा त्रास हीं होणार नाही

Add Comment

Viral Video :चालत्या बाईकवर 'हायव्होल्टेज' ड्रामा!...लोक पाहत राहिलीत..!

मुंबई: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका अशा व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे जो पाहून

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली ! मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी