विमानतळावरचे महागडे पदार्थ खरेदी करायचे नसतील तर ट्राय करा ही आयडिया

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी एक अभिनव युक्ती केली. पैशांची बचत करण्यासाठी महिलेने भन्नाट आयडिया केली. तिने फ्लाईटच्या आधी आवश्यक सामान आणि स्नॅक्ससाठी ब्लिंकिट (Blinkit) वर ऑर्डर केली. जे फक्त 10 ते 15 मिनिटात विमानतळावर डिलिव्हर झालं. महिलेची ही जबरदस्त ट्रीक प्रवाशांसाठी हा एक सोपा , वेगवान आणि चांगला पर्याय ठरू शकते.


विमानतळावर नेहमीच लांब रस्ता, व्यस्त टर्मिनल्स आणि महाग खाण्याचे पदार्थ असतात. हे पदार्थ अनेकांना परवडत नाहीत. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एकवर लेओवर दरम्यान या महिलेनं फ्लाईटच्या आधी गरजेचं सामान घेण्याचा सोपा उपाय शोधला. त्यानंतर जे झालं..त्या गोष्टीकडे सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. महिला प्रवाशाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, तुम्ही एअरपोर्टवर 1000 रुपयांचे स्नॅक्स खरेदी करणे टाळू शकता. कारण तुम्हाला आताच समजलं असेल की, तुम्ही दिल्ली एअरपोर्टच्या आतमध्येही ब्लिंकिटने ऑर्डर करू शकता.





या व्हायरल पोस्टमध्ये महिला प्रवाशाने म्हटलंय, मी ग्वालियरहून सिंगापूरला जात होती. दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल 1 कडे माझं काही तासांचं लेओवर होतं. मी टर्मिनल वर जशी पोहोचली, मला कळलं की मी माझे स्नॅक्स आणि पर्सनल केअरच्या गोष्टी पॅक करणं विसरले. माझी फ्लाईट रात्री होती. तेव्हा मी विचार केला की, ब्लिकिंटने ऑर्डर करू शकते. मी बाहेर येऊन ब्लिकिंट अ‍ॅपवर माझं करन्ट लोकेशन टाकलं. त्यानंतर ब्लिकिंट ऑर्डर घेऊन थेट एअरपोर्टच्या आतमध्ये आलं. 10-15 मिनिटांच्या आत मला माझ्या आवश्यक सर्व गोष्टी मिळाल्या.


इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने म्हटलंय, भारतातील या डिलिव्हरी सेवा खूप पसंत आहेत. 15-20 मिनिटांत तुम्ही काहीही ऑर्डर करू शकता. दुसऱ्या यूजरने म्हटलं, स्नॅक्स पॅक करायची गरज काय..जेव्हा ब्लिंकिट तुमच्यासोबत आहे. एका व्यक्तीने मजेशीर कमेंट करत म्हटलं, आता एअरपोर्टवर विचारावं लागणार नाही की, हे दहा रुपयांचं बिस्किटचं पॅकेट किती रुपयांचं आहे.

Comments
Add Comment

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात