‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी


ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा उपक्रम बंद पडला आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीने येथील कार्यरत परिचारिकांचे पगार थकवल्याच्या तक्रारी खोपट येथील भाजप कार्यालयात 'जनसेवकाचा जनसंवाद' या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे करत न्यायाची मागणी केली आहे. हे दवाखाने बंद पडल्याने त्याचा ताबा इतर व्यवसायिकांनी घेत त्याचा अन्य 'उद्योग' धंद्यांसाठी होत असल्याचीदेखील चर्चा आहे. शहरात ४० ठिकाणी सुरू असलेल्या या दवाखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचा सहा महिन्यांचा पगारदेखील थकला आहे. तो मिळवून देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी आ.केळकर यांच्याकडे निवेदन देऊन केली. यावेळी माजी उप महापौर अशोक भोईर, माजी नगरसेवक भरत चव्हाण, राजेश गाडे आदी उपस्थित होते.


याबाबत बोलताना संजय केळकर यांनी सांगितले की, आपला दवाखाना हा उपक्रम राबवण्यासाठी ठाणे महापालिकेने बंगळुरु येथील मेडको नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. ऑक्टोबरपर्यंत या कंपनीकडे कंत्राट होते, मात्र ऑगस्टमध्येच हे दवाखाने बंद पडले. तत्पूर्वी मागील सहा महिन्यांचा पगारदेखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला नाही. कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील कोरडी गेली. या कंपनीला ५६ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी ही कंपनी पालिकेला दाद देत नाही. त्यामुळे पालिकेने कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे'', अशी मागणी केळकर यांनी केली. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा या कर्मचाऱ्यांचा पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही आ. केळकर यांनी दिला आहे.


''एखादा उपक्रम सुरू करायचा, तो बंद पडला की दुसरा उपक्रम सुरू करायचा. पालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही. लोकांना थातुरमातुर सेवा देणारी यंत्रणा नको, सक्षम आरोग्यसेवा देणारी यंत्रणा महापालिकेने उभी करायला हवी'', असे मतही आ. केळकर यांनी मांडले. बंद पडलेल्या दवाखान्यांच्या अनेक ठिकाणी इतर व्यवसाय सुरू झाल्याचे दिसत असून एके ठिकाणी तर साड्यांचे दुकान सुरू झाले आहे. त्यामुळे या जागादेखील गिळंकृत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

मिरा-भाईंदर महापालिकेचे इलेक्शन गणित ठरले! ९५ पैकी ४८ जागांवर महिलांना संधी

ओबीसीच्या २५ जागा; 'या' प्रभागांत दोन महिला नगरसेविका निवडल्या जाणार भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी

नवी मुंबईच्या निवडणुकीसाठी 'सीट फिक्स'! १११ पैकी ५६ जागांवर महिलांचे वर्चस्व

SC साठी ५, ST साठी १ जागा महिलांसाठी राखीव; इच्छुकांचे धाबे दणाणले! नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या (NMMC) आगामी

ठाण्यात 'आरक्षण लॉटरी' फुटली! कोणाचा पत्ता कट, कोणाला संधी?

३३ प्रभागांत १३१ नगरसेवक निवडले जाणार! ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांना ज्या क्षणाची उत्सुकता

ढोकाळीतील ५० वर्षे जुने मंदिर गायब!

तक्रार नोंदविण्यास पोलीसांची टाळाटाळ ठाणे  : ढोकाळी येथील हायलँड पार्क रोड येथे असलेले ५० वर्षे जुने कुलदैवताचे

मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी उद्या होणार सुनावणी, अभियंत्यांची चूक नाही असा वकिलांचा दावा!

ठाणे: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्यांबाबत मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी अटकपूर्व

तानसा अभयारण्यासह परिसरात २३ प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन

शहापूर : अडई, हरिद्र, कोतवाल, शिंपी, वेडा राघू, नदीसुरय, तिसा अशा एक ना अनेक रंगबिरंगी विहंगांचा मुक्त विहार