महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून (दि.२३) सरकार ‘सहेली स्मार्ट कार्ड’ योजना सुरू करत आहे. या कार्डच्या माध्यमातून महिला आणि ट्रान्सजेंडर प्रवासी दिल्लीतील डीटीसी आणि क्लस्टर बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी परिवहन विभागाला सर्व तयारी लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून ही योजना यशस्वीपणे राबवता येईल.


सहेली स्मार्ट कार्ड हे सध्या सुरू असलेल्या पेपर-आधारित ‘पिंक तिकीट सिस्टीम’ च्या जागी आणले जात आहे. ही पद्धत २०१९ मध्ये सुरू झाली होती. हे कार्ड एक डिजिटल ट्रॅव्हल पास असेल, ज्याच्या मदतीने महिला आयुष्यभर, कोणत्याही वेळेची मर्यादा न ठेवता, मोफत प्रवास करू शकतील. हा उपक्रम दिल्ली सरकारचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था डिजिटल आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने मोठा टप्पा मानला जात आहे.


कार्डवर प्रवाशाचे नाव आणि फोटो असेल, जेणेकरून त्याचा गैरवापर होऊ नये. हे कार्ड फक्त दिल्लीतील महिला आणि ट्रान्सजेंडर नागरिकांनाच मिळेल. ज्यांचे वय १२ वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.



सहेली कार्ड असलेल्या प्रवाशांना डीटीसी आणि क्लस्टर बसमध्ये मोफत प्रवास करता येईल. तसेच, हेच कार्ड दिल्ली मेट्रो किंवा इतर वाहतूक सेवांमध्ये, जिथे पेमेंट आवश्यक आहे, रीचार्ज करून वापरता येईल.यामुळे प्रवास पूर्णपणे डिजिटल, कॅशलेस आणि पारदर्शक होईल.


सहेली स्मार्ट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया असेल.अर्जदाराला दिल्ली ट्रान्सपोर्ट विभागाच्या (डीटीसी) वेबसाइटवर जाऊन “सहेली स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन” या विभागात नोंदणी करावी लागेल. अर्ज करताना नाव,जन्मतारीख, आधार क्रमांक पत्ता आणि मोबाईल क्रमांक हि माहिती भरावी लागेल. तसेच,


फोटो, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र हि कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज सबमिट केल्यानंतर केवायसी पडताळणी होईल आणि त्यानंतर कार्ड जारी केले जाईल.डीटीसी काउंटरवरून थेट कार्ड दिले जाणार नाही.


एकदा कार्ड सक्रिय झाल्यानंतर, प्रवाशाने बसमध्ये चढताना ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन मशीनवर कार्ड टॅप करावे लागेल. यामुळे प्रवासाचा रेकॉर्ड आपोआप सिस्टीममध्ये नोंदवला जाईल आणि तिकीट प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल व कॅशलेस होईल. दिल्ली सरकारनुसार, महिला प्रवाशांचा डीटीसीमधील एकूण प्रवाशांमधील वाटा सुमारे ३२% आहे.अशा परिस्थितीत हे कार्ड महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि सशक्त बनवेल. या योजनेचा उद्देश असा आहे की महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि डिजिटल पद्धतीने सार्वजनिक वाहतूक वापरण्याची संधी मिळावी.

Comments
Add Comment

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

रायपूर : भारतमाला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात झालेल्या अनियमिततांच्या

सुप्रीम कोर्टाची अरावली प्रकरणात स्वतःच्या निर्णयालाच स्थगिती

नवी दिल्ली : अरावली खटल्याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात पर्वतरांगांच्या नवीन व्याख्येवर

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह