बदलापुरात आढळला दुर्मीळ मलबार पिट वायपर प्रजातीचा साप

बदलापूर : बदलापुरातील आदर्श विद्यामंदिर शाळेबाहेरील पदपथावर एक सर्प नागरिकांना निदर्शनास आल्यावर 'स्केल्स अँड टेल्स कॉन्सर्वेशन' संस्थेचे सर्पमित्र विकास आढाव व रतेश कारेकर यांनी त्याला वनविभाग बदलापूर येथील वनाधिकारी वैभव वाळिंबे यांच्या ताब्यात दिले. सदर साप हा मलबार चापडा (मलबार पिट वायपर) प्रजातीचा अत्यंत दुर्मीळ विषारी साप असल्याचे त्यांचे लक्षात आले. या प्रजातीच्या सापांचे वास्तव्य महाराष्ट्रात फक्त आंबोली घाट परिसरात उंच डोंगरावर थंड हवेच्या ठिकाणी असते. हा साप बदलापूरात कसा आला याबाबत वनाधिकाऱ्यांनी तपास करून हा दुर्मिळ साप ज्या ठिकाणी आढळला त्या ठिकाणी गोवा, सिंधुदुर्ग या ठिकाणाहून येणाऱ्या टूर्स आणि ट्रॅव्हल बसचा थांबा असल्याने हा साप सदर वाहनासोबत आल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी वर्तविला असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.


अत्यंत दुर्मिळ व वेगळ्या रंगाच्या ह्या सर्पास सर्पमित्र व वनविभाग यांच्या मदतीने वाचवण्यात यश आलेले असून उप वनसंरक्षक ठाणे सचिन रेपाळ यांच्या आदेशाने व सहायक वनसंरक्षक भाग्यश्री पोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सर्पास त्याच्या मूळ अधिवास असलेल्या आंबोली घाट परिसरात वनाधिकारी व सर्पमित्र यांच्या मदतीने आज सुखरूप सोडण्यात आले. 'स्केल्स अँड टेल्स कॉन्सर्वेशन'चे सर्पमित्र संकेत कर्णिक व वनरक्षक दिपक बेनके यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी कौतुक करून साप अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असल्याने मारू नका असे आवाहनही केले.


मलबार चापडा हा विषारी प्रजातीचा विशिष्ट हवामानात आढळणारा आकर्षक रंगसंगतीचा २ ते ३ फूट लांबीचा दुर्मिळ साप असून तो निशाचर आहे, ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळल्याची नोंद असून महाराष्ट्रामध्ये आंबोली घाटामध्ये उंच माथ्यावर दाट जंगलात हा साप जास्त संख्येने आढळून येतो.
- वैभव वाळिंबे, वनपरिमंडळ अधिकारी अंबरनाथ.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे