अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला.
शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच म्हणून केली होती.ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील सक्रिय होते.त्यांनी २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला. २००९ ते २०१४ या दरम्यान १० वर्षे त्यांनी राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करत राहुरी मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवला होता. ते अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे एक महत्त्वाचे आणि प्रभावी नेते होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते.
आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.