Vi: वी कडून ग्राहक आणि व्यवसायांसाठी वी प्रोटेक्ट एआय-पॉवर्ड सुरक्षेची घोषणा

एसएमएस स्पॅम डिटेक्शन, इंटरनॅशनल कॉलिंग डिस्प्ले आणि इतर उपायांबरोबरीने सुरु केले व्हॉइस स्पॅम डिटेक्शन


सायबर डिफेन्स आणि इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टिम सुरु केली


प्रतिनिधी:भारतातील टेलिकॉम कंपनी वी (Vi) ने आज वी प्रोटेक्ट या सर्वसमावेशक एआय-पॉवर्ड उपक्रमाची घोषणा केली आहे. यामध्ये वीचे सर्व ग्राहक, नेटवर्क आणि व्यवसायांच्या सुरक्षेसाठीच्या उपायांना एकत्रित केले जाईल व अशातऱ्हेने स्पॅम, स्कॅम आ णि सायबर हल्ल्यांच्या वेगाने वाढत्या धोक्यांच्या विरोधातील उपायांना एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाईल असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले.या उपक्रमांतर्गत वी ने इंडिया मोबाईल काँग्रेस २०२५ मध्ये दोन प्रभावी उपाययोजना प्रस्तुत केल्या आहेत - एआ यवर आधारित व्हॉइस स्पॅम डिटेक्शन सिस्टिम आणि एआय-चालित नेटवर्क डिफेन्स आणि इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टिम या आहेत.कंपनीने वी ची व्हॉइस स्पॅम डिटेक्शन सिस्टिम धोकादायक आणि फसवे स्पॅम कॉल्स पटकन ओळखते व त्यांची स्पष्ट सूचना देते अ से म्हटले. त्यानुसार ती सिस्टिम अत्याधुनिक एआय मॉडेल्स, वेब क्रॉलर्स आणि युजर फीडबॅक वापरून ही सिस्टिम संशयास्पद कॉलर्स ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या आधीच त्यांना ओळखते.


माहितीनुसार, एखाद्या वी ग्राहकाला जेव्हा संभाव्य फसव्या नंबरवरून कॉल येईल, तेव्हा फोन स्क्रीनवर 'सस्पेक्टेड स्पॅम' असे दिसेल. त्यामुळे ग्राहक आधीच ठरवू शकेल की त्या कॉलला उत्तर द्यायचे की नाही. याचे काम थर्ड-पार्टी कॉलर आयडी ऍप्सप्रमाणे चा लते, ही यंत्रणा वीच्या नेटवर्कमध्ये काम करते त्यामुळे अधिक अचूक असते, यामध्ये गोपनीयता अधिक जास्त असते.ही नवी सुविधा वी च्या आधीपासून कार्यरत असलेल्या प्रचंड मोठ्या ग्राहक सुरक्षा उपायांचा एक भाग आहे, हे सर्व उपाय आता वी प्रोटेक्ट या ए काच छताखाली एकत्र आणले गेले आहेत.


टेक्स्ट मेसेजचे स्पॅम फिल्टरिंग: धोकादायक, फसवे एसएमएस मेसेज ओळखून ग्राहकांना त्याची स्पष्ट कल्पना दिली जाते.


इंटरनॅशनल कॉलिंग डिस्प्ले:हे वैशिष्ट्य टेलिकॉम उद्योगक्षेत्रात पहिल्यांदा सादर केले जात आहे, इंटरनॅशनल कॉलिंग डिस्प्लेमुळे ग्राहकांना खरे इंटरनॅशनल कॉल्स कोणते ते लगेच ओळखता येते आणि कॉल घ्यायचा की नाही हा निर्णय संपूर्ण माहितीनिशी घे ता येतो.


एआय-पॉवर्ड थ्रेट ऍनालिसिस: वी चे डीएनएस, एसएमएस आणि व्हॉइस गेटवेमध्ये हे एकत्रित करण्यात आले आहे, हे ऍनालिटिकल इंजिन धोक्याच्या पॅटर्न्सवरून सातत्याने शिकत राहते आणि त्यामुळे सुरक्षा वाढते.


कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे की,' आजवर वी च्या सिक्युरिटी सिस्टिम्सनी ६०० मिलियनपेक्षा जास्त स्पॅम आणि स्कॅम कॉल्स व मेसेजेसची स्पष्ट कल्पना दिली आणि हजारो ग्राहकांना धोक्यापासून डेटा चोरीपासून वाचवले. वी लवकरच युआरएल प्रोटेक्शन सुरु करणार आहे, यामध्ये संशयास्पद लिंक्स पटकन तिथल्या तिथे स्कॅन व ब्लॉक केल्या जातील आणि फिशिंग व मालवेयर हल्ल्यांना प्रतिबंध घातला जाईल.'


वी प्रोटेक्ट अंतर्गत वी ने अपग्रेडेड एआय-पॉवर्ड सायबर डिफेन्स आणि इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम देखील सुरु केली आहे. आपले मुख्य नेटवर्क आणि एंटरप्राइज ऑपरेशन्स सुरक्षित राहावीत यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या डिफेन्स सेंटरमध्ये संभा व्य सायबर धोके एक तासापेक्षा कमी वेळेत ओळखून, त्यांचे विश्लेषण करून न्यूट्रलाइज कर्णयसाठी एजेंटिक आणि जनरेटिव्ह एआय मॉडेल्सचा वापर केला जातो, त्यामुळे आधीपेक्षा खूप कमी वेळात हे काम होते. ही सिस्टीम आधीपेक्षा जवळपास ७०% जास्त अचूक आहे आणि चुकीचे पॉझिटिव्ज खूप कमी करते. यामध्ये पाच पायऱ्या असलेली सुरक्षा यंत्रणा वापरली जाते –


ऍनोमली डिटेक्शन: एजेंटिक एआय असामान्य ऍक्टिव्हिटी स्वतःहून ओळखू शकते.


कॉन्टेक्सच्युअलायझेशन आणि कॅटेगरायझेशन: ही सिस्टीम काँटेक्स्च्यूअल इंटेलिजन्स वापरून घटनांचे वर्गीकरण करते.


इंटरफेस इंजिन एजंट: हाय-व्हॉल्युम डेटावर प्रक्रिया करून वेगाने निर्णय घेतले जातात.


सजेस्टिव्ह इंटेलिजन्स - एआयमध्ये धोक्याच्या पातळीच्या आधारे प्रतिसाद कृतींना प्राथमिकता दिली जाते.


ह्युमन व्हॅलिडेशन - तज्ञ विश्लेषक एआय निष्कर्षांना प्रमाणित करतात व मॉडेल सातत्याने सुधारत राहतात.


लवकरच वी या क्षमता एंटरप्राइज ग्राहकांना उपलब्ध करवून देईल, जागतिक सायबर घटना आणि धोक्याच्या टाईमलाईन्स यांचा सह-संबंध लावून अनुमान माहिती पुरवेल असे कंपनीने म्हटले.वी प्रोटेक्टच्या माध्यमातून वी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्या ची सायबर क्षमता आणि ग्राहकांचा विश्वास मजबूत करण्याची आपली वचनबद्धता वी ने अधोरेखित केली आहे आणि भारताचे डिजिटल भविष्य घडवण्यात सुरक्षित आणि विश्वासार्ह योगदान देणारी कंपनी हे आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.

याविषयी बोलताना वीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर जगबीर सिंग यांनी वी प्रोटेक्टविषयी सांगितले, 'भारतात डिजिटलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे,जागतिक स्तरावर भारताचे महत्त्व वाढत आहे, त्यामुळे ग्राहकांचे नेटवर्क सुरक्षित राखणे हे आ ता अधिक महत्त्वाचे बनले आहे. वी प्रोटेक्टमध्ये प्रगत एआय आणि सक्रिय उपाययोजनांचा वापर केला आहे, ते आमच्या ग्राहकांना सुरक्षित ठेवते व आमचे नेटवर्क मजबूत करते. वी प्रोटेक्ट म्हणजे डिजिटल वातावरणाची सुरक्षितता व विश्वासार्हता वाढावी यासाठी ची आमची वचनबद्धता आहे.'

Comments
Add Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'गुड गव्हर्नन्स' साध्य करण्यासाठी वाणिज्य विभाग कामाला ! युद्धपातळीवर कार्यक्षमता आणि स्वच्छ प्रशासनासाठी विशेष मोहीम ५.० पार

प्रतिनिधी:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्दिष्टानुसार सरकारी विभागांच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी सरकारी

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी

Lumax Q2RESULTS: Lumax Industries कंपनीचा निकाल जाहीर! कंपनीच्या करोत्तर नफ्यात १६% वाढ तर मार्जिनमध्येही सुधारणा

मोहित सोमण:लुमॅक्स इंडस्ट्रीज (Lumax Industries) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) करोत्तर

मेट्रोंना विविध सेवा देणारी आता एकच कंपनी

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्राधिकरण आणि कंपन्यांचे मेट्रो प्रकल्पांचे एकत्रिकरण

कृषी समृद्धी योजनेस राज्य सरकारची मान्यता

मुंबई (प्रतिनिधी) : "कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय

एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतील अंतिम उमेदवार यादीवर आक्षेप घेत एमसीएच्या काही