शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर बुधवारी सुनावणी

मुंबई : शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटात धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर उद्या, बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासह गेलेत. त्यानंतर पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह यावरून उद्ध ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले. न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे आली. आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण (पक्षचिन्ह) एकनाथ शिंदे यांना दिले. परंतु, शिंदे गटाला हे चिन्हा कायमस्वरूपी मिळालेले नाही.


दरम्यान, न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे. 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार होती त्यामुळे हा खटला लांबणीवर पडला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडतील. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम राहणार की ते पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

जे. के. सावंत मार्ग जोडणारा येलवे रस्ता सेनापती बापट मार्गाला जोडणार मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

भरती परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या

वरळी विधानसभेत प्रभाग आरक्षित झाल्याने मनसेची पंचाईत

भाजप, शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग यंदा वरळीत भाजप कमळ फुलवणार? सचिन धानजी मुंबई : दक्षिण

राज्यात अनेक जिल्ह्यांना आज थंडीचा इशारा

मुंबई : राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी (दि. १८