राखीव खाटा न दिल्याने परळच्या ग्लोबल रुग्णालयावर कारवाई

राज्यमंत्री माधुरी मिसाळ; अतिरिक्त एफएसआय सवलत रद्द करणार


मुंबई : परळ येथील ग्लोबल रुग्णालयाकडून गरीब रुग्णांसाठी राखीव १५ टक्के खाटा उपलब्ध करून न दिल्याबाबत राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली असून रुग्णालयावर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच राज्य शासनाच्या अटींचे पालन न केल्यामुळे रुग्णालयाला देण्यात आलेली अतिरिक्त एफएसआय सवलतही काढून घेण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.


मुंबईतील परळ येथील ग्लोबल रुग्णालयाने महानगरपालिकेच्या बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याचा, तसेच १५ टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव असून गेल्या १५ वर्षांपासून या खाटा उपलब्ध करून न दिल्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी कारवाईची मागणी केली आहे, यावर राज्य शासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी लक्षवेधी सूचना अजय चौधरी यांनी मांडली. या चर्चेत योगेश सागर, अनंत नर यांनी सहभाग घेतला.


राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, रुग्णालयास मंजुरी देताना महानगरपालिकेच्या दरानुसार १५ टक्के खाटा उपलब्ध करून देण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, संबंधित रुग्णालयाकडून ही अट पाळली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे नूतनीकरण थांबविण्यात आले होते परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे रुग्णालयास नूतनीकरण मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.


बांधकाम परवानगी नाकारली


रुग्णालयाच्या तिसऱ्या विंगच्या बांधकामास परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच काही मजल्यांना वापर परवाना (ओसी) देण्यात आलेला नाही. उर्वरित बांधकामालाही परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आवश्यकतेनुसार संबंधित मजले ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Monsoon Update : देशात पावसाची 64 टक्के तूट; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

मुंबई : भारतात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. सोमवार, 15 जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या

Census : राज्यातील जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबई : जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या

Pre-Monsoon Preparations : ठाणे जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश

सर्व मनपानी आपापल्या क्षेत्रातील क्लस्टर पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे एमएसईबीची प्रलंबित कामे तत्काळ

Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा

मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai Metropolitan Region : आता एकाच तिकिटावर करा संपूर्ण 'एमएमआर'मध्ये बस प्रवास!

राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम मुंबई : मुंबई

Smart Meter : स्मार्ट मीटरवर मोठा निर्णय येणार? जयंत पाटील-फडणवीस भेट चर्चेत

मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि