नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार


मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांविरोधात राज्य सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे. केवळ गुन्हा केल्यावरच कारवाई न करता, आता या नागरिकांचा पासपोर्ट आणि व्हिसा तपासणीची मोहीम राबवण्यात येईल. ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे नाहीत, अशांना थेट डिटेंशन सेंटरमध्ये पाठवून हद्दपार करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.


पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि विरार परिसरातील बेकायदा नायजेरियन आणि बांग्लादेशी नागरिकांच्या प्रश्नावर आमदार स्नेहा दुबे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत आमदार नाना पटोले आणि हेमंत ओगले यांनीही सहभाग घेतला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "अनेक नायजेरियन नागरिक शिक्षण किंवा वैद्यकीय कारणासाठी व्हिसा घेऊन येतात. मात्र, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते बेकायदा वास्तव्य करतात. हद्दपारी टाळण्यासाठी हे लोक जाणीवपूर्वक स्वतःवर एखादा गुन्हा नोंदवून घेतात, जेणेकरून खटला सुरू असेपर्यंत त्यांना भारतात राहता येईल. ही 'मोडस ऑपरेंडी' ओळखून पोलिसांनी आतापर्यंत ६८ नायजेरियन नागरिकांना हद्दपार केले असून, १२२ जण सध्या अटक केंद्रात आहेत."



घरमालकांवरही कारवाईचा बडगा


अवैध नागरिकांना आश्रय देणाऱ्यांविरोधातही सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. वैध पासपोर्ट किंवा व्हिसा तपासल्याशिवाय कोणालाही राहण्यासाठी जागा देऊ नये, असे आदेश देण्यात येतील. नियमांचे उल्लंघन करून जागा भाड्याने देणाऱ्या घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.



नेमकी कारवाई काय करणार?


परदेशी नागरिक देशात आल्यानंतर त्यांच्या व्हिसाच्या मुदतीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभाग एक स्वतंत्र यंत्रणा (ट्रॅकिंग सिस्टीम) कार्यान्वित करणार आहे. वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील असलेल्या विदेशी नागरिकांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्यात येईल, तसेच आवश्यकता भासल्यास त्यांना तडीपारही केले जाईल. उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पबच्या नियमावलीत सुधारणा करण्यात येत असून, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पबचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा