दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

मुंबई (वार्ताहर): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन व फ्लाइंग कंदील उडविण्यास आणि विकण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई शहर व उपनगरात दिवाळीत फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यासह ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडविण्याचे प्रकार घडतात.


परिणामी, अनेकदा आगीची व मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक नामांकित व्यक्तींना हवाई यंत्रांद्वारे लक्ष्यही केले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायको-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून आदींच्या उड्डाण क्रियांना म्हणजेच आकाशात उडविण्यास ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यानच्या बंदी घालण्यात आली आहे. तसेच फ्लाइंग कंदीलचा साठा करण्यास व विक्री करण्यासही परवानगी नाही.

Comments
Add Comment

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.