Kotak Mahindra Bank Update: कोटक महिंद्रा बँकेचा चौफेर प्रभाव थेट ' इतक्याने' निव्वळ कर्जवाटपात वादळी वाढ !

प्रतिनिधी:सोमवारी कर्ज देणाऱ्या बँकेने जाहीर केलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार (Provisional Data) जुलै-सप्टेंबर तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेचे निव्वळ कर्ज इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १५.८% वाढून ४.६२ लाख कोटी रुपये झाले. माहितीनुसार, ४ .४४ लाख कोटी रुपयांवरून ४% वाढले आहे. बँकेच्या एकूण ठेवी ५.२८ लाख कोटी रुपयांवर गेल्या, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ४.६१ लाख कोटी रुपयांवरून १४.६% ठेवी वाढल्या आहेत. मागील तिमाहीत बँकेने एकूण ठेवी ५.१२ रुपये नोंदवल्या होत्या, जी चालू तिमाहीत ३.१% वाढ डेटात दर्शविली गेली आहे. चालू खाते आणि बचत खाते किंवा कासा (Current Account Saving Accou nt CASA) ठेवींमध्ये देखील वर्षानुवर्षे ११.२% वाढ होऊन २.०१ लाख कोटी रुपयांवरून २.२३ लाख कोटी रुपये झाले. बँके ने आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत कासा (CASA) २.०९ लाख कोटी रुपये झाल्यामुळे ६.७% ची सलग वाढ नोंदवली आहे .याशिवाय, कोटक महिंद्रा बँकेच्या सरासरी निव्वळ कर्जात (Average Net Loan) सरासरी कासा (CASA) आणि सरासरी ठेवींम ध्येही वाढ झाली असल्याचे बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे.


इयर ऑन इयर बेसिसवर मार्च तिमाहीत (Q1) निव्वळ नफा ३५५२ कोटी रुपये होता. रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, बँकेची मालमत्ता गुणवत्ता आणखी खराब झाली होती. जूनच्या अखेरीस सकल अनुत्पादक मालमत्तेचे (Gross NPA) प्रमाण १.४८% पर्यंत वाढले,जे मागील तिमाहीत १.४२% होते. निव्वळ एनपीएस (Net NPA) देखील मार्च तिमाहीत ०.३१% वरून ०.३४% पर्यंत वाढले आहे .बँकेच्या तरतुदी आणि आकस्मिकता (Provisions) वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढून १२०८ कोटी रुपये झाल्या आहेत. माहितीनुसार त्या मार्च तिमाहीत ते ९०९ कोटी रुपये होत्या तर किरकोळ व्यावसायिक वाहन आणि सूक्ष्म वित्त संस्था व्यवसायातील ताणामुळे तरतुदींमध्ये वाढ झाली होती.शुक्रवारी कोटक महिंद्रा बँकेचा शेअर एनएसईवर २.१७% उसळत २१०८ रूपये प्रति शेअरवर स्थिरावला हो ता

Comments
Add Comment

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबईजवळ ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, १४ कोटींची ड्रग्स जप्त

वसई : वसईच्या पेल्हार येथे मुंबई पोलिसांच्या झोन सहामधील अँटीनार्कॉटिक्स सेल आणि टिळक नगर पोलिसांनी मिळून

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाल बदने आला शरण

सातारा (Satara Doctor Death) : सातारा जिल्ह्यातील फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या