दिवाळीसाठी गावाला जाताय, रेल्वे सोडतेय ३० विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त अतिरिक्त विशेष गाड्या धावणार


मुंबई (प्रतिनिधी) : येत्या दिवाळी उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे ३० अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे दानापूर --सुपौल एक्सप्रेस बदललेल्या गाडी क्रमांकांसह धावणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ही गाडी सोमवार दि. ६, १३ व २० ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ८ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. ०१००४ साप्ताहिक विशेष गाडी रविवार दि. ५ . १२ व १९ ऑक्टोबर रोजी मडगाव येथून ४ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ६.२० वाजता पोहोचेल.


या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेर्डी, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, वीलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थीवी आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत.


पनवेल चिपळूण पनवेल अनारक्षित विशेष ही गाडी दि. ३ ऑक्टो. ते २६ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी पनवेल येथून १६.४० वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी २१.५५ वाजता पोहोचेल. ०११६० अनारक्षित विशेष गाडी दि. ३ ऑक्टो. ते २६ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी चिपळूण येथून ११.०५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. या गाड्या अनारक्षित असतील आणि त्यासाठी तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे बुक करता येतील.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम