जिंकण्याची खात्री असलेल्या जागाच लढवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत वक्तव्य


मुंबई : ज्या जागांवर विजयाची खात्री आहे, त्याच जागा लढवण्याचा निर्णय महायुती घेणार असून, केवळ संख्येसाठी जागा अडवण्याऐवजी इलेक्टिव्ह मेरिटवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई पालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकावणे हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील शिवसेना शाखाप्रमुखांच्या संवाद कार्यक्रमानंतर रात्री आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जागावाटपाबाबत महायुतीच्या समन्वयकांची बैठक होणार आहे. यात ज्या जागांवर विजयाची खात्री आहे, त्या जागा लढवण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जागेचे इलेक्टिव्ह मेरिट तपासले जाणार, असेही त्यांनी नमूद केले.


शिवसेनेने मुंबईतील शाखाप्रमुखांशी संवाद साधण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. शिंदे यांनी यावेळी शाखाप्रमुखांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘शाखाप्रमुख हा पक्षाचा कणा आहे. ते स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. आता सर्व शाखाप्रमुख निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी ते उत्सुक आहेत,’ असे शिंदे म्हणाले.


शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अडीच वर्षांत आणि आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. ‘मुंबई पालिकेसाठी विविध विकास प्रकल्प राबवले गेले आहेत. या कामांच्या जोरावरच विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. ही विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. जनता आमच्या कामांवर विश्वास ठेवते आणि याच विश्वासाच्या जोरावर आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळवू,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



मुंबईत महायुतीचाच महापौर


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महायुतीचाच महापौर असेल, असा दावा शिंदे यांनी केला. ‘कोणाला किती जागा मिळतील हे महत्त्वाचे नाही, तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवणं आणि महायुतीचा महापौर निवडून आणणे हे आमचे ध्येय आहे,’ असे त्यांनी सांगितलं. यासाठी कार्यकर्ते आणि पक्ष यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचंही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.