मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईत असलेला छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ तब्बल ८० दिवस बंद राहणार आहे. पुनर्विकासाच्या कामासाठी फलाट क्रमांक १८ तब्बल ८० दिवस बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ हा एक ऑक्टोबर २०२५ पासून ८० दिवस वापरता येणार नाही. फलाट १९ डिसेंबरपर्यंत वापरासाठी उपलब्ध नसेल. यामुळे अमरावती आणि नंदिग्राम एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत. रेल्वे एक ऑक्टोबर ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ चा पुनर्विकास करणार आहे. फलाट क्रमांक १८ वर प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या कामासाठी फलाट क्रमांक १८ च्या परिसरात खोदकाम केले जाईल. याच कारणामुळे छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ रेल्वे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. दादर ते सीएसएमटीदरम्यान पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेगाड्या रद्द राहणार आहेत. रेल्वे लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात आरएलडीए छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ चा पुनर्विकास करणार आहे.
सध्या छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाटांवर खांब उभारण्याचे काम सुरू आहे. फलाट क्रमांक १२-१३ वर सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होईल. यानंतर हा फलाट रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर सीएसएमटीतील फलाट क्रमांक १८ वर काम सुरू होणार आहे.