उल्हासनगर (वार्ताहर) : एका शिक्षिकेने तीन वर्षांच्या चिमुकल्याला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होताच संबंधित मुलाच्या पालकांना धक्का बसला आहे. मुलाच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कवितेवर टाळ्या वाजवल्या नाही म्हणून सदर शिक्षिकेने मारहाण केल्याचे उघड झाले आहे. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर ४ मध्ये ही शाळा आहे. सदर शाळेतील शिक्षिका मुलांना कविता शिकवत होती. मात्र चिममुरड्याने कवितेवर टाळ्या वाजवल्या नाहीत त्यामुळे शिक्षिकेने मुलावर हात उगारला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. चिमुरड्याच्या बहिणीच्या मैत्रिणीने सदर व्हिडीओ संबंधित मुलाच्या आईला दाखवला. पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली आहे.