सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते.


डोंबिवली: भारताने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी हा विजय पहलगाम हल्ल्यातील बळींना समर्पित केला असला तरी, या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी टीम इंडियाने हा सामना खेळायलाच नको होता अशी ठाम प्रतिक्रिया दिली आहे.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले डोंबिवलीचे संतोष जगदाळे, यांची पत्नी प्रगती जगदाळे यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये काल खेळल्या गेलेल्या आशिया कप २०२५ सामन्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  त्यांनी म्हंटले, "भारतीय खेळाडूंनी दबावाखाली पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी माझी इच्छा आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकोच होते."

काय म्हणाल्या प्रगती जगदाळे?


प्रगती जगदाळे पुढे म्हणाल्या की, मी सूर्यकुमार यादवला सांगू इच्छिते की, पहलगाम हल्ल्यातील बळींना हा विजय समर्पित करण्याऐवजी, टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नको होते. जर भारताने हा सामना खेळला नसता तर आम्हाला अधिक अभिमान वाटला असता, परंतु टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला, ज्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ जणांचा बळी घेतला आहे. याआधी झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे दहशतवादी होते. आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान आपला शत्रू आहे. आपण त्यांच्यासोबत खेळायला नकोच. टीम इंडियाने विजयासह हा सामना पहलगाम हल्ल्यातील बळींना समर्पित केला आहे, परंतु जर ते जिंकले नसते तर आमच्या खेळाडूंना पश्चात्ताप झाला असता. भारतीय खेळाडूंनी दबावाखाली पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी माझी इच्छा आहे"

रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाला भारताने १२७/९ च्या धावसंख्येवर रोखले. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक ४० धावा केल्या, तर शाहीन आफ्रिदीने संघाच्या खात्यात ३३ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल भारताने केवळ १५.५ षटकांत विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत ४७ धावा काढत नाबाद राहिला, तर तिलक वर्माने संघाच्या खात्यात ३१ धावांचे योगदान दिले.  या विजयासह 'सुपर फोर'मध्ये भारताचा प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे.
Comments
Add Comment

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०

नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे