OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या झाल्याची घटना उघडकीस येत आहे.


नाथापूर येथील गोरख देवडकर यांनी ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबली पाहिजे यासाठी त्यांनी स्वत:च आयुष्य संपवून घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुलगी पोलीस भरतीसाठी सराव करते आहे, मात्र आता मुलीचं काय होईल याच भीतीपोटी नैराश्यातून गोरख नारायण देवडकरयांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.


यापूर्वी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील ३५ वर्षीय तरुण भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून आपली व्यथा मांडली आहे. भरत कराड यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे कायमस्वरूपी आरक्षण धोक्यात आले आहे. “आमच्या हक्काचे आरक्षण हिरावून घेतले जात आहे. यामुळे पुढील पिढीचे भविष्य अंधारात जाणार आहे,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. कराड यांनी यापूर्वीही ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता, हे प्रकरण ताजे असताना, आता बीडमध्ये ओबीसी आरक्षण बचावासाठी दुसरी आत्महत्या झाली आहे, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर