नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या घटनेने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. ही घटना एका कंपनीचे मालक केव्ही अय्यर यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर केली आहे.
त्यांचे ४० वर्षीय कर्मचारी शंकर यांनी सकाळी ८:३७ वाजता त्यांना मेसेज करून "माझ्या पाठीत खूप दुखत आहे, त्यामुळे मी आज येऊ शकत नाही, कृपया मला रजा द्या" असे सांगितले. अय्यर यांनी लगेच "ठीक आहे, आराम करा" असे उत्तर दिले. परंतु, ८:४७ वाजता त्यांना शंकर यांच्या मृत्यूची बातमी मिळाली.
के. व्ही. अय्यर यांनी सांगितले की, शंकर हा गेल्या ६ वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत होता. तो पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होता. तो दारू किंवा सिगारेटला स्पर्श करत नव्हता.
शंकर विवाहित असून त्याला एक मुलगाही आहे. शंकरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (cardiac arrest) झाल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "माझा सहकारी, जो १० मिनिटांपूर्वी माझ्याशी बोलत होता, तो आता या जगात नाही. एका व्यक्तीने, शुद्धीवर असताना, त्याच्या शेवटच्या श्वासाच्या १० मिनिटांपूर्वी मला मेसेज केला. मी पूर्णपणे हादरून गेलो आहे.