Chitra Wagh : शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना रडत रौत अजून गप्प कसे?

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल


मुंबई : कर्नाटक राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळूरमधील ‘शिवाजीनगर मेट्रो स्टेशन’चे नाव बदलून ‘सेंट मेरी’ करण्याची मागणी काँग्रेस आमदार रिझवान यांनी केली आहे. विशेष म्हणजे, या मागणीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाठिंबा देत, नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचंही समोर आलं आहे. या घटनेमुळे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.


?si=N6vEzRI2BdWPQue0

चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर थेट हल्ला


भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "पुन्हा एकदा काँग्रेसचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा द्वेष उफाळून आला आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कर्नाटक काँग्रेसने केलेल्या या कृतीवर महाराष्ट्र काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.


"महाराष्ट्रातील काँग्रेस आता तरी आपली भूमिका स्पष्ट करणार की गप्प बसणार?" असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत असलेले त्यांचे मित्रपक्ष, विशेषतः त्यांच्यावर टीका करणारे, आता या अपमानावर गप्प का आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. "उबाठा गटाला डिवचत त्यांनी म्हटले की, इथले त्यांचे मित्रपक्ष आहेत... त्यांचा स्वयंघोषित विश्वगुरू रडत रौत अजून गप्प कसे?" असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.



राजकीय वादळ आणि महाराष्ट्रातील शांतता


कर्नाटक सरकारमधील या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पक्षांनी या अपमानावर गप्प राहणे, ही गंभीर बाब आहे. भाजपचा आरोप आहे की, कर्नाटक काँग्रेसने केलेला हा अपमान महाराष्ट्रातील काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मान्य आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं.


सध्या तरी, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, हा मुद्दा आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा रंगतदार संघर्ष निर्माण करणार, यात शंका नाही.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब