सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, अनेक घरांमध्ये घुसले गटाराचे पाणी


सोलापूर : लवकरच परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण राज्यातील काही भागांमध्ये पाऊस धुमाकूळ घालत आहे. सोलापूर जिल्ह्यात २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये गटाराचे पाणी घुसले आहे. रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात वाताहात झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.


हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याला २४ तासांसाठी रेड अलर्ट दिला होता. जिल्ह्यात २४ तासांत ११८.३ मिमी पावसाची नोंद झाली. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चपाळगाव, चुंगी या गावांमध्ये रात्रभर मुसळधार पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून चार हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. बोरी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. नदी किनारी कोणीही जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते वाहतूक पुरती मंदावली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नगरिकांच्या संपत्तीचे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. नागरिकांची तारांबळ उडाली.


Comments
Add Comment

आता ओबीसींचा महामोर्चा मुंबईकडे, दसऱ्यानंतर रंगणार निर्णायक लढा

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मराठा समाजाने आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं बेमुदत

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

पक्षाला यश मिळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या

बीडमध्ये रस्ते अपघातात नातीसह सरपंचाचा दुर्देवी मृत्यू

बीड: बीडच्या परळी तालुक्यात झालेल्या रस्ते अपघातात एका सरपंचाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परळी

समृद्धी महामार्गावर खिळे नाही, तर ॲल्युमिनिअम नोजल्स! बेशिस्त कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खीळे लावण्यात आल्याचे काही

सागरी मंडळाच्या प्रकल्पांना विविध परवानगी मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सर्वसंबंधितांना सूचना मुंबई : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या

समृद्धी महामार्गावरील निष्काळजीपणानंतर खिळे काढले, वाहतूक पुन्हा सुरळीत

पुणे: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा पुन्हा चर्चेत आला आहे. या महामार्गावर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात