Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो, जो मराठी नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, तर प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले. तसेच शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवून नवे युग सुरू केले. हा दिवस केवळ विजयाचे प्रतीक नसून चैतन्य आणि मांगल्याचा उत्सव आहे. घरोघरी उभारली जाणारी गुढी समृद्धीचे दर्शन घडवते. नव्या संकल्पांची सुरुवात करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी गुढीपाडव्याचे महत्त्व अधोरेखित होते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस शुभ म्हणून नवीन कामाचा, कार्याचा आरंभ या दिवशी केला जातो.

गुढीपाडवा का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचे महत्त्व? गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?


श्रीराम १४ वर्षे वनवास भोगून, रावणाचा वध करून, विजयी होऊन अयोध्या नगरीत आले, तो हाच वर्षप्रतिपदेचा दिवस होता.
ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली, तो चैत्र होता. म्हणून त्या महिन्याची सुरुवात गुढी उभारून केली जाते, असे म्हणतात. शालिवाहनाने शकाचा पराभव करण्यासाठी मातीचे सहा हजार सैनिक तयार केले होते, त्यात प्राण निर्माण करुन फौज तयार केली आणि शकाचा पराभव केला, या पराक्रमाची आठवण म्हणून शालिवाहनाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला शक सुरू केला, असेही म्हणतात.

गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त


गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. तरीही गुढी उभारण्यासाठी सकाळचा वेळ सर्वोत्तम मानला जातो. सूर्योदयानंतर ते सुमारे सकाळी १०:३० वाजेपर्यंत गुढी उभारावी.

गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त


चैत्र प्रतिपदा तिथी आरंभ १९ मार्च सकाळी ६.५२ वाजता
चैत्र प्रतिपदा तिथी समाप्त २० मार्च पहाटे ४.५२ वाजता

गुढीपाडवा २०२६ पूजा विधी


पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करा. घराची स्वच्छता करून दारासमोर रांगोळी काढा. घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि फुलांचे तोरण लावा. देवघर स्वच्छ करून दिवा प्रज्वलित करावा.

गुढी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य


बांबूची काठी
स्वच्छ रेशीम/नवीन कापड (विशेषतः पिवळे, केशरी, हिरवे रंगाचे)
साखर गाठी
कडुलिंबाची पाने
आंब्याची पाने
फुलांचा हार
तांब्या/चांदी/स्टीलचा लोटा (पालथा ठेवण्यासाठी)
हळद-कुंकू, अक्षता
अगरबत्ती, दिवा, नैवेद्य

गुढी कशी उभारावी?


बांबूची काठी स्वच्छ करून त्यावर वस्त्र बांधावे.
फुलांचा हार, साखरेच्या गाठी, कडुलिंब-आंब्याची पानांनी गुढी सजवावी.
तांब्या/लोटा पालथा ठेवावा.
घराच्या उजव्या बाजूला खिडकीत किंवा गॅलरीमध्ये उंच ठिकाणी गुढी उभारावी.
गुढीला हळद-कुंकू, अक्षता, फुले, नैवेद्य अर्पण करावा.
Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून