‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ उपसा


मुंबई : राज्यातील जलस्त्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.०’ अभियानाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेमुळे आतापर्यंत राज्यातील ३ हजार २६८ जलसाठ्यांमधून ७.७३ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून, यामुळे तब्बल ७७ लाख पाण्याचे टँकर भरतील इतकी जलसाठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे ११ हजार ५८३ गावांतील सुमारे १ कोटी ३९ लाख नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे.


या योजनेचा सर्वाधिक लाभ राज्यातील शेतीला होत आहे. उपसा केलेला सुपीक गाळ सुमारे ६९ हजार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नेला आहे. विशेष म्हणजे, लाभार्थ्यांपैकी ९१ टक्के शेतकरी हे वंचित घटकांतील आहेत. सुपीक गाळामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत असून रासायनिक खतांवरील खर्चही कमी होत असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.


२०२५-२६ या आर्थिक वर्षात या मोहिमेने विशेष गती घेतली आहे. चालू वर्षात १,३९८ जलसाठ्यांमधून २.६९ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला. भंडारा आणि जळगाव जिल्ह्यांत गेल्या वर्षाच्या तुलनेत कामात ३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ३२ लाख, तर जळगावमध्ये १६ लाख घनमीटर गाळ काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भच नव्हे, तर गोंदिया आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यांतही या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे.



लोकसहभागातून जलक्रांती :


राज्यातील ४०० पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हे अभियान यशस्वी ठरत आहे. राज्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने भूजल पातळी वाढवण्यासाठी हा उपक्रम कणा ठरत आहे. संभाव्य ‘एल-निनो’चे संकट आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, जलसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी शासन हा उपक्रम यापुढेही जोमाने राबविणार आहे, असे जलसंधारण विभागाकडून सांगण्यात आले.



योजनेचा लेखाजोखा :


- एकूण जलसाठे : ३,२६८


- गाळ उपसा : ७.७३ कोटी घनमीटर


- लाभार्थी गावे : ११,५८३


- फायदा झालेले नागरिक : १.३९ कोटी


- संबंधित जिल्हे : ३४

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास