नवी दिल्ली : देशद्रोही आणि नक्षलवादी तसेच त्यांचे सहकारी पकडण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने धडक कारवाई सुरू केली आहे. देशातील पाच राज्यांमध्ये ठिकठिकाणी धाडी टाकून एनआयएने तपास सुरू केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये २२ ठिकाणी एनआयएने धाडी टाकल्या आहेत. स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलांची मर्यादीत प्रमाणात मदत घेतली जात आहे.
जम्मू काश्मीरमध्ये बारामुला, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा जिल्ह्यात ठिकठिकाणी एनआयएने धाडी टाकल्या आहेत. सेमापूर भागातून इकबाल नावाच्या व्यक्तीला एनआयएने ताब्यात घेतले आहे.
एनआयए एक कायदेशीर कारवाई करत आहे. या कारवाईबाबत आवश्यक तेवढी गोपनीयता बाळगण्यात आली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून एनआयए धाड टाकणे, तपास करणे, संशयितास पकडणे ही कारवाई केली आहे. अद्याप धाडसत्राबाबत एनआयएने सविस्तर माहिती दिलेली नाही.