Pankaja Munde on Maratha reservation :  “ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंची ठाम भूमिका”

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता यश मिळालं आहे. आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश आलं असून, मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य केल्याचं जाहीर केलं आहे. या निर्णयानुसार, गावातील लोक, नात्यातील लोक आणि कुळातील लोक यांची चौकशी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.


या घडामोडींवर राज्याच्या पर्यटनमंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. मला हे आधीपासूनच असं वाटत आलं आहे आणि पुढेही असंच वाटत राहील, यात कोणताही बदल होणार नाही.


ओबीसीवर अन्याय होऊ नये यासाठी समिती स्थापन


मराठा समाजासाठी शासनाने जीआर (Government Resolution) काढला असला तरी त्याचा परिणाम ओबीसी समाजावर होऊ नये, यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असल्याचे पर्यटनमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, असा सुवर्णमध्य राज्य सरकार काढेल अशी प्रार्थना आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


मुंडे म्हणाल्या की, सर्व समाज सुखाने आणि शांततेने नांदावा हीच आपली खरी इच्छा आहे. सामाजिक मागासलेपणाचा प्रश्न ओबीसी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि सरकार या समाजावर अन्याय होऊ नये अशी भूमिका निश्चितच घेईल, असा मला विश्वास आहे. जर नव्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो असे वाटत असेल, तर त्याची तपासणी करण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी उपलब्ध आहे. त्या काळात सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जाईल. “ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा ठाम शब्द आहे,” असे आश्वासन देतानाच, मुंडे यांनी सांगितले की सरकारकडून अन्याय टाळण्यासाठी आवश्यक ती पावलं आधीच उचलली जात आहेत.


हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला त्याचा प्रत्यक्ष लाभ होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण, आतापर्यंत जवळपास ५८ लाख ऐतिहासिक नोंदी शोधून काढण्यात आल्या आहेत. या नोंदींच्या आधारे अनेक मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील लाखो मराठा कुटुंबांना आरक्षणाचा मार्ग अधिक सुकर होणार असून, समाजात समाधान आणि दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून